CAT 2021 Result: महाराष्ट्रातील ४ अभियंते चमकले

संस्था अधिकृत वेबसाइटवर टॉपर्सची यादी जाहीर करणार आहे.
CAT 2021 Result today
CAT 2021 Result todaySaam Tv

अहमदाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबादने सामाईक प्रवेश परीक्षेचा २०२१ (CAT 2021 result announced) जाहीर केला आहे. व्यवस्थापन प्रवेश परीक्षा २८ नोव्हेंबरला घेण्यात आली होती. तब्बल दाेन लाख पेक्षा अधिक परीक्षार्थी निकाल लागण्याची वाट पहात हाेते. परिक्षार्था त्यांचा निकाल iimcat.ac.in या संकेतस्थळावर पाहू शकतात. (Latest News on CAT Results 2021)

आज जाहीर झालेल्या CAT 2021 च्या निकालात एकूण नऊ जणांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. त्यापैकी ४ महाराष्ट्रातील, दोन उत्तर प्रदेशातील आणि प्रत्येकी एक हरियाणा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणातील आहेत. संस्था अधिकृत वेबसाइटवर टॉपर्सची यादी लवकरच जाहीर करणार आहे. (IIM Ahmedabad has announced the Common Admission Test CAT 2021 results today)

CAT 2021 Result today
NTPC National Ranking Archery : आदिती स्वामीची सुवर्ण कामगिरी

यंदा एकूण ९ परीक्षार्थांनी १०० टक्के गुण मिळवले असून सर्व मुले आहेत. एकूण १९ परीक्षार्थींनी (सर्व पुरुष) 99.99 टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेत (exam) १०० टक्के गुण मिळवणाऱ्यांपैकी सात अभियांत्रिकी (enginnering) शैक्षणिक पार्श्वभूमीचे आहेत तर दाेन बिगर अभियांत्रिकीचे विद्यार्थी (student) आहेत.

IM CAT 2021 निकाल: स्कोअरकार्ड कसे तपासायचे

  • अधिकृत iimcat.ac.in संकेतस्थळास भेट द्या

  • लॉगिन बटणावर क्लिक करा

  • क्रेडेन्शियल्स एंटर करा

  • एडमिट कार्ड ऍक्सेस करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा

CAT निकालातील पर्सेंटाईलच्या आधारे, IIM आणि इतर बी-स्कूलमध्ये एमबीए प्रवेश दिला जाईल. प्रत्येक आयआयएम पर्सेंटाइलवर आधारित शॉर्टलिस्ट जारी करेल. त्याचा कट ऑफ देखील जाहीर केला जाणार आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com