NTPC National Ranking Archery : आदिती स्वामीची सुवर्ण कामगिरी

राष्ट्रीय स्पर्धेत आदितीने उत्तम कामगिरी केल्याने साता-यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
archer aditi gopichand swami
archer aditi gopichand swami

सातारा : हैद्राबाद येथे सुरु असलेल्या पहिल्या NTPC नॅशनल मानांकन धनुर्विद्या स्पर्धेत गचीबोवली स्टेडियमवर महाराष्ट्रच्या आदिती गाेपीचंद स्वामी (archer aditi gopichand swami) हिने कंपाऊंडमध्ये सुवर्ण कामगिरी नाेंदवली आहे. तिने राजस्थानच्या माया बिष्णाईस पिछाडीवर टाकले. ntpc national ranking archery tournament in hyderabad

यामध्ये देशभरातील आघाडीचे धनुर्धारी (archery) रिकर्व आणि कंपाऊंड या दोन्ही प्रकारात सब-ज्युनियर (मुले आणि मुली), कनिष्ठ (पुरुष आणि महिला) आणि वरिष्ठ (पुरुष आणि महिला) या प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. आज कंपाऊड राऊंडमध्ये विजय मिळविलेली महाराष्ट्राची आदिती स्वामी ही सातारा (satara) जिल्ह्यातील आहे.

archer aditi gopichand swami
पुढच्या वर्षी पहिलीत जाणा-या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

एनटीपीसीचे प्रादेशिक कार्यकारी संचालक (दक्षिण) सुनील कुमार सत्य यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. ते म्हणाले देशाच्या विकासाला बळ देण्यासोबतच विविध आणि प्रभावी CSR उपक्रमांद्वारे NTPC आपल्या समुदाय आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आधारस्तंभ आहे.

या स्पर्धेचा समाराेप १० जानेवारीला होणार आहे. तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस प्रमोद चांदूरकर यांनी भारतात तिरंदाजी विकसित करण्याच्या व्यापक योजनेवर त्यांची भावना व्यक्त केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com