Video: वडील नसलेल्या बहीणीला भावाने दिलं असं गिफ्ट की, सर्वांच्याच डोळ्यात आले अश्रू

Hyderabad Bride Receiving Wax Statue | बहुतेकजण भावाने दिलेल्या या गिफ्टचं कौतुक करतायत. मात्र काहींनी हे चुकीचं देखील वाटलं आहे.
Bride receiving wax statue of her late father as a gift
Bride receiving wax statue of her late father as a gift Youtube/@Thrinetra wedding films
Published On

हैदराबाद : मुलीचं लग्न म्हटलं की तिच्या कन्यादानाचं सुख आणि कर्तव्य हे भारतीय संस्कृतीत वडिलांना मिळतं. लेक सासरी जाताना सर्वात जास्त दुःख होतं ते म्हणजे तिच्या पित्याला. ज्या मुलींना आपल्या वडिलांकडून कन्यादानाचं पुण्य लाभलं त्या मुली खरोखरच नशीबवान समजल्या जातात. मात्र, ज्या मुलीचे वडील मुलीच्या लग्नाआधीच मरण पावतात अशा मुलींना तिच्या लग्नात तिच्या वडिलांची सर्वात जास्त आठवण येत असते.

हैदराबादच्या (Hyderabad) एका नवधूलाही (Bride) तिच्या विवाहाच्या दिवशी वडिलांची आठवण येत होती. आपल्या कन्यादानासाठी आपले वडिल आज हयात असते किती बरं झालं असंत असं तिला वाटत होतं. तिच्या लग्नात तिच्या भावानं तिला असं काही गिफ्ट दिलं की, लग्नाला आलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. वधूच्या भावाने आपल्या बहिणीली आपल्या वडिलांचा चक्क पुतळा (Wax Statue) दिला. हा मेणाचा पुतळा अतिशय बोलका आणि हुबेहुब तिच्या वडिलांसारखाच असल्याने तिला अश्रू अनावर झाले होते. (Hyderabad Bride Receiving Wax Statue News)

हे देखील पाहा -

हैदराबाद येथील फणी कुमार नावाच्या व्यक्तीने आपल्या बहिणीला त्यांचे दिवंगत वडील सुब्रमण्यम यांचा मेणाचा पुतळा तिच्या लग्नात भेट म्हणून दिला. वधूने तिची आई, पती आणि कुटुंबातील इतरांसह लग्नमंडपात प्रवेश केला, तेव्हा तिला तिच्या समोर जवळपास जिवंत आकृती दिसली. हे पाहून वधू लगेचच भावूक झाली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, तिच्या आईलाही तिचे अश्रू आवरता आले नाहीत.

वधूने तिच्या वडिलांच्या पुतळ्याला भावनिक आलिंगन आणि चुंबन दिले. यानंतर वडिलांच्या जागी त्यांच्या पुतळ्याला बसवून लग्नाचे सर्व विधी पार पाडले. या ३ मिनिटांच्या क्लिपमध्ये, जवळजवळ प्रत्येकजण पाणावलेल्या डोळ्यांनी वधूला आशीर्वाद देत होता.

Bride receiving wax statue of her late father as a gift
R Praggnanandhaa : पॅरासिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा प्रज्ञानानंद 'अजिंक्य'; रचला इतिहास

या व्हिडिओला ८० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, बहुतेकजण भावाने दिलेल्या या गिफ्टचं कौतुक करतायत. मात्र काहींनी हे चुकीचं देखील वाटलं आहे. काहींना ते अत्यंत भावनिक वाटले, तर इतरांना ते अगदी भितीदायक वाटले.

काही लोकांनी तर याला धक्कादायक म्हटले आणि लग्नानंतर पुतळा कुठे ठेवणार असा सवाल केला. एका यूजरने कमेंट केली की, "हे खूप भावनिक आणि गोड आहे. आई-वडिलांचे प्रेम अतुलनीय आहे," तर दुसर्‍या यूजरने लिहीलं की, "खूप वाईट कल्पना. आम्ही मृतांना मृत राहू देण्याचे एक कारण आहे. आता पुतळ्याचे काय होईल? एका खोलीत बंद कराल का? हे सर्वांसाठी त्रासदायक आहे. बिचारी मुलगी. तिच्याबद्दल कोणीही विचार केला नाही का? ती स्तब्ध दिसते. तर आणखी एका यूजरने लिहीलं की "लग्नानंतर ते पुतळ्याचं काय करतील? याची खरी उत्सुकता आहे. त्याला खोलीत बंद ठेवतील? तो तुमच्याकडे टक लावून पाहण्यासाठी हॉलमध्ये ठेवाल? वीज गेली की, वर एक वात चिकटवा आणि मेणबत्ती म्हणून त्याचा वापर करा असा खोचक टोलाही एका यूजरने लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com