Husband Wife Case: पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही; हायकोर्टाचं मत

husband wife case: एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. भारतीय दंड संहितेनुसार तो गुन्हा ठरत नाही, असं मत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवलं.
High Court on husband wife case
High Court on husband wife case SAAM TV

High Court on husband wife case

एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. भारतीय दंड संहितेनुसार तो गुन्हा ठरत नाही, असं मत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवलं. अशा प्रकरणांमध्ये पतीला पत्नीची संमती घेणं महत्वाचं नाही, असंही न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं आहे.

High Court on husband wife case
Mumbai News: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती उघड

विवाहानंतर पतीने-पत्नीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले, तरीही त्याला बलात्कार (Crime) म्हणता येणार नाही. कायदेशीर पद्धतीने विभक्त झाल्यानंतर किंवा वेगळे राहत असलेल्या पत्नीबरोबर लैंगिक कृत्य केलं, तर तो बलात्कार ठरतो, असं सांगत कोर्टाने पोलिसांना एफआरआर रद्द करण्याचे आदेश दिले.

नेमकं काय आहे प्रकरण?

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) नरसिंगपूर येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीवर बलात्काराचे आरोप केले होते. माझ्या संमतीशिवाय पती माझ्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवतो, असंही महिलेने तक्रारीत म्हटलं होतं. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.

यावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयात (High Court) शुक्रवारी (ता. ३) सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अहलूवालिया म्हणाले, "लग्नानंतर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही".

"भारतीय दंड संहितेनुसार तो गुन्हा ठरत नाही. अशा प्रकरणामध्ये पत्नीच्या सहमतीला महत्व नसतं. तसं पाहता कलम ३७५ अंतर्गत कोणत्याही महिलेशी तिच्या सहमती शिवाय शरीरसंबंध ठेवणं हा गुन्हाच आहे. पण यामध्ये काही अपवाद देखील आहे. पतीने पत्नीशी संभोग केला असेल, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. पत्नीला तशी तक्रार दाखल करता येणार नाही".

High Court on husband wife case
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला बसला धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com