UNSC: भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळेल; पण करावी लागेल 'ही' गोष्ट, काय म्हणाले परराष्ट्रमंत्री?

UNSC Permanent Seat For India : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना साधरण ८० वर्षापूर्वी झाली होती. यात आधी चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम ब्रिटन, आणि अमेरिका या देशांचा या परिषदेत समावेश होता. या देशांनीच स्थायी सदस्य होण्याचा निर्णय घेतला होता.
UNSC Permanent Seat For India
UNSC Permanent Seat For IndiaYandex

S. Jaishankar On UN Security Council Permanent Seat For India :

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थायी सदस्यता मिळवण्यासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. आपल्या देशाला या परिषदेचे सदस्यत्व मिळेल का नाही यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भाष्य केलंय. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व नक्कीच मिळेल. जगभरातील देशांना वाटतं की, भारताला परिषदेचं सदस्यत्व मिळाले पाहिजे. परंतु यासाठी भारताला यासंदर्भात अधिक मेहनत घ्यावी लागेल, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणालेत.(Latest News)

एस. जयशंकर हे गुजरातच्या राजकोट शहरातील एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी युएनएससीच्या स्याथी सदस्य होण्याच्या शक्यतां संदर्भात प्रश्न केला. त्याला परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना साधरण ८० वर्षापूर्वी झाली होती. यात आधी चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम ब्रिटन, आणि अमेरिका या देशांचा या परिषदेत समावेश होता. या देशांनीच स्थायी सदस्य होण्याचा निर्णय घेतला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यावेळी ही परिषद उद्यास आली त्यावेळी जगातील ५० देश स्वतंत्र झाले होते. आता स्वतंत्र देशांची संख्या १९३ झालीय. परंतु परिषदेत समाविष्ट असलेल्या देशांनी आपल्याचकडे या परिषदेचं नियंत्रण ठेवलंय. ही विचित्र गोष्ट आहे की, आपल्याला आपल्यातील बदलासाठी त्यांची सहमती मिळावावी लागते. काही देश आपले मत प्रामाणिकपणे बाळगतात. तर काही देश समोर वेगळं मत मांडतात आणि पाठीमागून वेगळं मत मांडत असतात.

भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं, यासाठी दीर्घकाळापासून मागणी केली जात आहे. तसेच जगातील इतर देशांना वाटतं की, भारताला या परिषदेचा सदस्य बनवण्यात यावे. इतर देशांची इच्छा वाढू लागलीय. आपल्याला निश्चितपणे या परिषदेची स्थायी सदस्यता मिळेल, परंतु यासाठी आपल्याला अजून कठोर मेहनत घ्यावी लागेल, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणालेत.

भारत, जपान, जर्मनी आणि इजिप्त या देशांनी मिळून संयुक्त राष्ट्र संघासमोर एक प्रस्ताव मांडला असून यामुळे हे या विषय थोडा पुढे सरकेल, असा विश्वास एस जयशंकर यांनी व्यक्त केलाय. पण आपण दबाव आणला पाहिजे आणि जेव्हा हा दबाव वाढतो तेव्हा संयुक्त राष्ट्र संघ कमकुवत झाल्याची जगात भावना निर्माण होते. युक्रेन युद्धावर युएनमध्ये अडथळा निर्माण झाला होता.गाझा संदर्भात युएनमध्ये एकमत होऊ शकले नाही. मला वाटतं ही भावना जसजशी वाढत जाईल तसतशी आपली कायमची जागा मिळण्याची शक्यता वाढत जाईल.

UNSC Permanent Seat For India
India China Controversy: 'लबाड' चीनला भरला दम; अरुणाचलच्या ३० ठिकाणांची नावं बदलल्यावर भारत कडाडला!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com