Himachal Accident: हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात; पर्यटकांनी भरलेली बस खोल दरीत पडली

प्रवाशांमध्ये तीन आयआयटी वाराणसीचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Himachal Accident
Himachal AccidentSaam Tv
Published On

Himachal Accident News : हिमाचलच्या कुल्लूमध्ये एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. पर्यटकांनी भरलेली कार खड्ड्यात पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 लोक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसमध्ये (Bus Accident) एकूण 16 लोक होते. यामध्ये 3 विद्यार्थी आयआयटी वाराणसीचे असल्याची माहिती समोर आली आहे.

Himachal Accident
Beed: फंडासाठी निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला; खासदार मुंडेंनी जाहीर भाषणातून खडेबोल सुनावले

हा अपघात काल रात्री 8.30 च्या सुमारास कुल्लूमधील बंजार व्हॅलीच्या घियागी भागात NH-305 वर झाला. अपघातात जखमी झालेल्या 10 लोकांपैकी 5 जणांना कुल्लूच्या झोनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून 5 जणांवर बंजार येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री 11.35 वाजता मदत आणि बचाव कार्य संपले. मृतांमध्ये 5 तरुण आणि 2 मुलींचा समावेश आहे. प्रवाशांमध्ये तीन आयआयटी वाराणसीचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

रात्री साडेआठच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर खड्ड्यात पडल्याने येथे गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक बचावासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र खराब हवामान आणि अंधारामुळे बचावकार्यात मोठी अडचण आली. या बचावकार्याला सुमारे दोन तास लागले.

रस्त्यापासून सुमारे 400 मीटर खाली दरीत पडलेल्या वाहनातून जखमींना वाचवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बंजारचे आमदार सुरेंद्र शौरीही घटनास्थळी पोहोचले. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जखमींना मदत करण्यासाठी त्यांनी लोकांकडून मदत मागितली.

जखमींना बंजार रुग्णालयात आणण्यासाठी प्रशासनाकडून रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या होत्या. जखमींना तातडीने बंजार रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर जखमींवर बंजार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com