Amit Shah News: 'सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली; सुप्रिया सुळेंच्या टीकेला अमित शहांचा पलटवार

Amit Shah Replied to Supriya Sule : सभागृहात बोलताना अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं
Amit Shah News
Amit Shah NewsSaam tv
Published On: 

No Confidence Motion : मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्तावावर सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी प्रस्तावावर सभागृहात बोलताना अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात बोलताना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिले. शहा यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही उत्तर दिलं.

'सुप्रिया सुळे यांनी आरोप केला की, 'आम्ही सरकार पाडलं. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात कोणी केली असेल, तर शरद पवारांनी केली. शरद पवारांनी वसंत पाटील यांचं सरकार पाडून मुख्यमंत्री झाले', अशा शब्दात अमित शहा यांनी सुप्रिया सुळे याच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Amit Shah News
Vijay Wadettiwar on Bacchu Kadu : बच्चू कडू भविष्यात महाविकास आघाडीसोबत येतील, विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

तत्पूर्वी, मणिपूरमधील घटनांवर भाष्य करताना अमित शहा म्हणाले, 'मणिपूरमध्ये जी घटना घडली, त्याच्यावर मी सविस्तर बोलू इच्छितो. मी विरोधी पक्षाच्या मणिपूरमधील मुद्याशी सहमत आहे. मणिपूरमधील घटना लाजिरवाणी आहे. यावर राजकारण करणं त्यापेक्षाही लाजिरवाणी आहे. मात्र, सरकार मणिपूरवर बोलायला तयार नाही हा भ्रम पसरवला जात आहे. मी पत्र लिहून चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं होतं'.

'विरोधकांनी सदनात चर्चा करू दिली नाही. गृहमंत्री यांना मणिपूरबाबत बोलू दिले जात नाही, ही कसली लोकशाही ? असा सवाल अमित शहा यांनी यावेळी केला .

अमित शहा यांनी विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवरही भाष्य केलं. 'यूपीए चांगलं नाव होतं. मग नाव का बदललं? कदाचित १२ लाख कोटीचे घोटाळे होते म्हणून त्यांनी नाव बदललं. यूपीएने 'बोफोर्स घोटाळा, टूजी घोटाळा , सत्यम घोटाळा , कॉमन वेल्थ घोटाळा, कोळसा घोटाळा, आदर्श घोटाळा , नॅशनल हेरॉल्ड घोटाळा, चारा घोटाळा, IPL घोटाळा, काँग्रेस अध्यक्ष यात्रा घोटाळा यूपीएने केला आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली.

Amit Shah News
Vijay Wadettiwar on PM Modi: लालकृष्ण अडवाणी कोणाच्या अहंकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत? काँग्रेस नेत्याचा PM मोदींना सवाल

'नाव बदलण्यापेक्षा दुसरा मार्ग यांच्याकडे नाही. आम्ही ताठ मानेने लोकांसमोर जात आहोत. मोदींनी देशाला स्थिर सरकार दिलं आहे. मोदींनी प्रत्येकाच्या मनात देशाप्रती सन्मान जागविला आहे, असेही ते म्हणाले .

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी काल मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. महागाई, एलपीजीच्या वाढलेल्या किंमती, अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, ९ वर्षात ९ सरकार भाजपने पाडली सगळ्याची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com