Family Court Divorce Rules: लग्नानंतर एका वर्षाच्या आत घटस्फोट घेता येणार नाही: हायकोर्ट

Allahabad High Court Hindu Marriage: २ हिंदू व्यक्तींमधील विवाह हा एक पवित्र बंधन आहे. विवाहाच्या वर्षभरात नातं मोडू शकत नाही, असं अलाहबाद उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटलं आहे.
Allahabad court
Allahabad court Google
Published On

२ हिंदू व्यक्तींमधील विवाह हा एक पवित्र बंधन आहे. विवाहाच्या वर्षभरात नातं मोडू शकत नाही, असं अलाहबाद उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटलं आहे. जरी दोन्ही पक्षांनी परस्पर सहमती दर्शवली, तरीही नातं मोडता येणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह कायदा, १९५५च्या कलम १४ नुसार, अतित्रास किंवा अनैतिक कारणे असल्याशिवाय विवाह मोडता येऊ शकत नाही, असंही खंडपीठानं म्हटलं आहे.

दोन हिंदूंमधील विवाह हे पवित्र नातं आहे. कायद्याने मान्यता दिलेल्या कारणांसाठीच ते वेगळे होऊ शकतात, असं खंडपीठानं स्पष्ट केलं. हिंदू जोडप्याने घटस्फोट क्षुल्लक कारणावरून घेऊ नये, असे न्यायमुर्ती अश्विनी कुमार मिश्रा आणि डी. रमेश यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालय, सहारनपूरच्या निर्णयाला आव्हान देणारं अपील फेटाळताना हा आदेश दिला आहे.

Allahabad court
Union Budget 2025: करदात्यांसाठी आनंदाची बातमी, ITR भरण्याची मुदत वाढू शकते? नक्की खरं काय ?

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा आणि डी. रमेश यांच्या खंडपीठाने निकाल देताना सांगितलं की, घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यासाठी कलम १४ मध्ये लग्नाच्या एक वर्षाची तरतूद आहे. अपवादा‍त्मक अडचण किंवा अनैतिक कारणे असल्यास अशी याचिका विचारात घेतली जाऊ शकते.

Allahabad court
Nagpur News: असला कसला राग? वाढदिवस साजरा करत नसल्यामुळे चिडला, १० वर्षांच्या मुलानं घर सोडलं

काय आहे नेमकं प्रकरण?

लग्रानंतर अविवाहीत जोडप्यानं घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती. दोघांनाही हा घटस्फोट हवा होता. दोघांच्या मंजूरीनुसार घटस्फोटाची प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं नव्हतं. कौटुंबिक न्यायालयाने लग्नाच्या पहिल्या वर्षाच्या आत घटस्फोटाच्या अर्जास परवानगी देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सहारनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. खंडपीठानं देखील वर्षाच्या आत घटस्फोट देणं चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com