Himachal Election 2022 : देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी; हिमाचलसाठी भाजपचा प्लॅन बी तयार

हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSAAM TV
Published On

Himachal Pradesh Election 2022 : गुजरात आणि हिमाचलप्रदेश या दोन राज्यांच्या निवडणुकीचा निकाल (Election 2022) आज जाहीर होत आहे. त्यासाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये भाजपने आतापर्यंत १५० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेसची मात्र दयनिय अवस्था दिसून येत आहे. काँग्रेस फक्त १७ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि कॉग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis News
Gujarat Election Results Live : भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

गुजरात विधानसभेत भाजपने १८२ पैकी १५० जागांवर आघाडी घेतली असली तरी, हिमाचलप्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. हिमाचलप्रदेशात भाजप २७ तर काँग्रेस ३७ जागांवर आघाडीवर आहे. अशातच हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिमाचलप्रदेशात मोठी जबाबदारी मिळाली आहे. भाजपला हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडल्या तर देवेंद्र फडणवीस अपक्ष उमेदवारांची मदत घेऊन येथे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. सध्या देवेंद्र फडणवीस हे हिमाचलच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा प्लान बी तयार केला आहे. जागा कमी पडल्यास तिथे असलेल्या अपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे दोन दिग्गज नेते हिमाचल प्रदेशाकडे रवाना झाले आहेत.

Devendra Fadnavis News
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा एकदा भाजपचं ऑपरेशन लोटस?

हिमाचल प्रदेशात भाजपला मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा फटका बसला आहे. नालागडहून अपक्ष उमेदवार के एल ठाकूर हे आघाडीवर आहेत. ठाकूर हे भाजपचे माजी आमदार आहे. हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यावर ते नाराज असल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत हिमाचलप्रदेशात भाजपने ४४ जागा घेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. यंदा मात्र, भाजपला काही जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. २५ ते ३५ जागा यंदा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागा यंदा वाढताना दिसत आहेत. काँग्रेसला गेल्या वेळी २१ जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेस जवळपास ३८ जागांवर आघाडीवर आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com