Gujarat Election Results Live : भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

Gujarat Election Results Live : गुजरात, हिमाचलमध्ये कुणाची सत्ता? मतमोजणीला सुरूवात, वाचा प्रत्येक अपडेट…
Gujarat assembly Election Results 2022 Live Updates
Gujarat assembly Election Results 2022 Live Updates Saam TV

भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

एक्झिट पोलमध्ये दिसलेल्या कलांनुसार गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपाचे उमेदवार 159 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

काँग्रेस 15 तर बहुचर्चित आम आदमी पक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्षांना आणि अपक्षांना 3 जागांवर आघाडी मिळाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा 28, काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसला ऑपरेशन लोटसची भीती

हिमाचल प्रदेशात ६८ जागांपैकी ४० जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे, तर २५ जागांवर भाजप आघाडीवर आहे. कॉंग्रेसच्या विजयाची शक्यता जास्त दिसत असतानाच कॉंग्रेसला आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची भीती सतावत आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस आपल्या विजयी उमेदवारांना राजस्थान येथील एका रिसॉर्टमध्ये हलवणार असल्याची माहिती साम टीव्हीला सुत्रांनी दिली आहे. 

Himachal Election 2022 : देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी; हिमाचलसाठी भाजपचा प्लॅन बी तयार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिमाचलप्रदेशात मोठी जबाबदारी मिळाली आहे. भाजपला हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडल्या तर देवेंद्र फडणवीस अपक्ष उमेदवारांची मदत घेऊन येथे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. सध्या देवेंद्र फडणवीस हे हिमाचलच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

Himachal Pradesh Election Results : हिमाचलमध्ये भाजपला मोठा फटका; काँग्रेसची मुसंडी, जाणून घ्या निकाल

गुजरातमध्ये मोठी आघाडी घेतलेल्या भाजपला हिमाचल प्रदेशात मोठा फटका बसला आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली असून जवळपास ३८ जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार २७ जागांवर आघाडीवर आहे. तर तीन जागांवर अपक्ष आमदार सरस ठरत आहेत. हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे.

Gujarat Election Results 2022 : गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक आघाडी, काँग्रेसची दाणादाण, AAP ला किती जागा?

गुजरात विधानसभा निवडणुकीत सातव्यांदा कमळ फुलण्याचे संकेत आहे. कारण, भाजपने १५० हून अधिक जागांवर आघाडी घेतली असून ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. दुसरीकडे गुजरात निवडणुकीत काँग्रेस फक्त १७ जागांवर आघाडीवर आहे. २०१७ मध्ये काँग्रेसला गुजरातमध्ये ७० जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी ७ जागांवर आघाडीवर आहे.

Himachal Pradesh Election 2022 : गोव्यानंतर फडणवीसांना मोठी जबाबदारी; हिमालच प्रदेशात भाजपचा प्लॅन बी तयार?

गुजरात विधानसभेत भाजपने १८२ पैकी १५० जागांवर आघाडी घेतली असली तरी, हिमाचलप्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. हिमाचलप्रदेशात भाजप ३१ तर काँग्रेस ३३ जागांवर आघाडीवर आहे. अशातच हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिमाचलप्रदेशात मोठी जबाबदारी मिळाली आहे. भाजपला हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडल्या तर देवेंद्र फडणवीस अपक्ष उमेदवारांची मदत घेऊन येथे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. सध्या देवेंद्र फडणवीस हे हिमाचलच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

Gujarat Election Results 2022 : गुजरातमध्ये आपची १० जागांवर आघाडी, काँग्रेसला मोठा फटका, भाजपला किती जागा?

गुजरात विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती आले असून आम आदमी पक्षाने १० जागांवर आघाडी घेतली आहे. गुजरातमध्ये आपच्या एन्ट्रीचा काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत फक्त १९ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपने मात्र ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल केली असून तब्बल १४९ जागांवर आघाडी घेतली आहे.


मतमोजणीत ट्रेंड बदलला, आम आदमी पक्षाची ९ जागांवर आघाडी, काँग्रेसची २३ जागांवर आघाडी, भाजप १४६ जागांवर आघाडीवर

हिमाचलमध्ये भाजपला मोठा फटका; कॉंग्रेसने घेतली भक्कम आघाडी, वाचा प्रत्येक अपडेट…

Summary

हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ६८ जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. याठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हिमाचलप्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. हिमाचलप्रदेशात काँग्रेस ३५ तर भाजप ३२ जागांवर आघाडीवर आहे.

Gujarat Election Results Live : गुजरातमध्ये मोठी घडामोड; भाजपचे हार्दिक पटेल पिछाडीवर, वाचा प्रत्येक अपडेट…

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. गुजरातमध्ये सुरूवातीलाच भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप 131, काँग्रेस 48 तर आम आदमी पार्टी 2 जागांवर आघाडीवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपने जरी आघाडी घेतली असली तरी त्यांचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Gujarat Election Results Live : गुजरात विधानसभेत भाजपची मोठी आघाडी; काँग्रेस, आप पिछाडीवर, वाचा प्रत्येक अपडेट…

गुजरात विधानसभेच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरूवात झाली असून मतमोजणीच्या सुरूवातीलाच भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, भाजप 65 जागा,काँग्रेस 22 जागा, आणि आप 3 जागांवर आहे.

Gujarat Election Results Live : गुजरात, हिमाचलमध्ये कुणाची सत्ता? मतमोजणीला सुरूवात, वाचा प्रत्येक अपडेट…

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या दोन्ही राज्यांची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून दोन्ही राज्यांतील मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com