Kullu Cloudburst Video: कुल्लूमध्ये ढगफुटी; रस्ते खचले, घरं, दुकानं गेली वाहून

Himachal Pradesh Cloudburst in Kullu: हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेल्या मोठ्या ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यात रस्ते खचले असून घरे आणि वाहनांचे नुकसान झाले.
Himachal Pradesh Cloudburst in Kullu
Cloudburst in Kullu: Roads collapse, houses and vehicles swept away in flash floods
Published On

राज्यात कोसळधार सुरू असून अनेक भागांना पुराचा फटका बसलाय. भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र, पुढील4 तास मुंबईसाठी अत्यंत धोक्याची असल्याचं सांगितलं जातं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातही तुफान पाऊस होत आहे. उत्तर भारतातील अनेक प्रदेशात ढगफुटीच्या घटना घडत आहेत. धराली, किश्तवाड नंतर आता हिमाचलमधील कुल्लूमध्ये ढगफुटीची घटना घडलीय. या ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले असून अनेक घरं, वाहने वाहून गेली आहेत. तर जागोजागी रस्ते खचले आहेत.

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, अद्याप यात कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांच्या सीमेवरील भुभू जोत पर्वतावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ढगफुटीची घटना घडलीय. ढगफुटीमुळे डोंगराच्या बाजूला असलेल्या लघाटी येथील तीन घरे आणि काही वाहने वाहून गेली आहेत.

Himachal Pradesh Cloudburst in Kullu
Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

मंडी जिल्ह्यातील चौहर खोऱ्यातही मोठे नुकसान झालंय. या खोऱ्यातील सिल्हबुधानी, कुंगड आणि स्वार या गावांमध्ये एक दुकान, दोन मत्स्यपालन प्रकल्प, तीन पदपथ आणि शेकडो एकर जमीन वाहून गेली आहे. दरम्यान १९९३ मध्येही याच भागात ढगफुटी झाली होती, त्यावेळीही येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Himachal Pradesh Cloudburst in Kullu
Gadchiroli Weather Update : गडचिरोलीत मुसळधार पावसाने थैमान, तब्बल १०० गावांचा संपर्क तुटला

हिमाचलमध्ये जनजीवन विस्कळीत

राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. तीन राष्ट्रीय महामार्गांसह ४०० हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत. सतलज नदीच्या काठावरील भूस्खलनामुळे शिमला जिल्ह्यामधील सुन्नी भागात शिमला-मंडी रस्ता बंद झालाय. या रस्त्याची रुंदी कमी झाल्याने तो धोकादायक बनलाय. त्याचबरोबर थाली पुलावरून जाणारा पर्यायी मार्गही बंद झाल्याने कारसोगचा शिमलाशी संपर्क तुटलाय. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं जात आहे.

महाराष्ट्रात तुफान पाऊस; रस्त्यांना नद्यांचे स्वरुप, अनेक गावात शिरले पाणी

राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मुसळधार पाऊस होत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून अनेक गावांना पुराचा वेढा पडला. तर अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com