

नवी दिल्ली: हीरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp) अध्यक्ष पवन मुंजाल (Pawan Munjal) यांच्या घरावर आयकर विभागाने (IT Raid) छापा टाकला आहे. पवन मुंजाल यांच्याशिवाय त्यांच्या कंपनीच्या इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर देखील छापे टाकण्यात येत आहेत. हे छापे करचुकवेगिरीच्या प्रकरणांशी संबंधित आहेत. पवन मुंजालच्या गुरुग्राम, हरियाणा, दिल्ली (Delhi) आणि इतर काही ठिकाणी असलेल्या कार्यालयांवर आणि निवासी जागेवर छापे टाकण्यात येत आहेत.(Income Tax Raid On Hero Motocorp)
आयकर विभागाने एअर चार्टर एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिरो कॉर्प ग्रुपवर छापे टाकले आहेत. हिरो कॉर्प मुंजाल ब्रदर्सचे आहे. तर एअर चार्टर मनिंदर सिंग सेठी यांच्या मालकीचे आहे.
हे देखील पहा -
स्टॉक २ टक्क्यांनी घसरला
Hero MotoCorp च्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. शेअर 2380 रुपयांच्या खाली 2 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचबरोबर वाहन क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअर्सवरही याचा परिणाम झाला आहे. मारुती, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर यांच्या देखील शेअरमध्ये1.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.
Hero MotoCorp ची कमाई
कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार, Hero Motocorp चा एकूण नफा ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 36.7% घसरून 686 कोटी रुपयांवर आला. त्याच वेळी, अगदी वर्षभरापूर्वी याच दरम्यान Hero Motocorp चा नफा 1084.47 कोटी रुपये होता.
डिसेंबरमध्ये कंपनीने 7883 कोटी रुपये कमावले होते. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 9776 कोटी रुपये होते. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 19.4% ने घट झाली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.