Gujarat-Madhya Pradesh Rain : गुजरात, मध्य प्रदेशला पावसाचा तडाखा, पूरसदृश्य परिस्थिती; रेल्वेला फटका, अनेक ट्रेन रद्द

Madhya Pradesh, Gujarat Heavy Rain : मध्य प्रदेशात चंबळ आणि शिप्रा नदीनं धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. तर रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.
Madhya Pradesh, Gujarat Heavy Rain
Madhya Pradesh, Gujarat Heavy RainSAAM TV

Madhya Pradesh And Gujarat Heavy Rain :

मध्य प्रदेश आणि गुजरातला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. दोन्ही राज्यांतील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना आज, १८ सप्टेंबर रोजी हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिला आहे.

गुजरात आणि मध्य प्रदेशमधील अनेक भागांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. आसपासच्या परिसरांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या दाहोदमध्ये मुसळधार पावसामुळं वानाकबोरी धरण ओसंडून वाहत आह. त्यामुळं परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशात चंबळ आणि शिप्रा नदीनं धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. तर रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.

मध्य प्रदेशात पावसानं हाहाकार माजवला आहे. रतलाम विभागातील झाबुआ जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील रूळाचा भाग खचला आहे. रेल्वेवाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. डाउन मार्गावरील रेल्वेगाड्या कासवगतीने जात आहेत. खचलेला भागात भराव आणि ट्रॅकचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. ३०० मजुरांसह अधिकारी हे काम करत आहेत. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशासह गुजरातमध्येही पावसानं थैमान घातलं आहे. भरूचमध्ये मुसळधार पावसामुळं अनेक भागांत पाणी साचलं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. (Heavy Rainfall)

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. मंदसौर, अलीराजपूर, झाबुआ आणि रतलाम आदी ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणांना रेड अलर्ट जारी केला आहे.

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पुराच्या वेढ्यात अख्खं कुटुंब अडकलं होतं. त्यात एका गरोदर महिलेचाही समावेश होता. स्थानिक प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले.

Madhya Pradesh, Gujarat Heavy Rain
Uttar Pradesh Accident : टवाळखोरांनी ओढणी खेचल्याने विद्यार्थिनीचा सायकलवरुन पडून मृत्यू, घटनेचा थरारक CCTV Footage समोर

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, गावांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत साडेचारशे नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खरगोन जिल्ह्यात ४५ निवारा केंद्रांमध्ये दोन हजारांहून अधिक नागरिक आहेत. इंदूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागातून दोनशेहून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. जिल्ह्यात एसडीईआरएफची आठ पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.

Madhya Pradesh, Gujarat Heavy Rain
Woman Loses Four Limbs: मासे खाणं महिलेच्या जीवावर बेतलं; शस्त्रक्रियेत दोन्ही हात अन् पाय कापले, नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com