Heavy Rain Alert : महाराष्ट्रासह २० राज्यांना अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

IMD alert for 20 States : सप्टेंबर उजाडून आता दुसरा आठवडा सुरू झाला. मात्र, पाऊस थांबलेला नाही. कारण भारतीय हवामान खात्यानं उद्या, गुरुवार, ११ सप्टेंबरला महाराष्ट्रासह जवळपास २० राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
20 राज्यांत पावसाचा अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधारेची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
IMD issues heavy rain alert for Maharashtra and 19 other states; downpour likely on September 11.saam tv
Published On
Summary
  • भारतीय हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा

  • महाराष्ट्रासह २० राज्यांना अलर्ट

  • ११ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा अंदाज

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत ऑगस्टमध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच काहिशी विश्रांती घेणारा पाऊस पुन्हा धो- धो बरसणार आहे. भारतीय हवामान खात्यानं तसा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यात ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्किम, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.

ओडिशाच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस : अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारी प्रदेश, मध्य प्रदेशचा पूर्वेकडील भाग, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडील परिसर, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, कर्नाटकाचा उत्तरेकडील भाग, पश्चिम बंगाल आणि सिक्किम, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज.

अंदमान आणि निकोबार, बिहार, कर्नाटकचा काही भाग, झारखंड, ओडिशा, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे.

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उत्तराखंड आदी राज्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

20 राज्यांत पावसाचा अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधारेची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या दोन तऱ्हा, कुठे ऊन तर कुठे पाऊस? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com