Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण

Boy Dies After Banana Gets Stuck in Throat: तामिळनाडूमध्ये ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. केळी घाताना घश्यात अडकल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. या मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण
Tamilnadu Shocking News Saam Tv
Published On

Summary -

  • तामिळनाडूमध्ये ५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

  • केळी खाताना घशात अडकल्याने झाला मृत्यू

  • रुग्णालयात नेताना आईच्या कुशीतच चिमुकल्याने सोडले प्राण

  • मुलाच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचे रडून रडून बेहाल

तामिळनाडूमध्ये हृदयद्रावक घटना घडली. एका ५ वर्षांच्या चिमुकल्याचा घश्यात केळी अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला. हा मुलगा केळी खात होता. त्यावेळी घशात केळी अडकली आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला रुग्णालयामध्ये नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याने प्राण सोडले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इरोड जिल्ह्यातील अन्नाई सत्य नगरमध्ये घडली. याठिकाणी राहणाऱ्या मणिक्कम यांचा पाच वर्षांचा मुलगा साईशरण केळी खात असताना त्याच्या घशात केळी अडकली. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शेजाऱ्याच्या मदतीने साईशरणच्या आई-वडिलांनी त्याला इरोडमधील एका खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण वाटेतच साईशरणचा मृत्यू झाला. त्याने आईच्या कुशीत प्राण सोडले. करुंगलपलयम पोलिसांनी या घनटेची नोंद करत तपास सुरू केला.

Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण
Shocking : अहिल्यानगर हादरलं! पुलाखाली आढळला ४ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह; नेमका काय प्रकार?

साईशरणचे वडील मणिक्कम आणि आई महालक्ष्मी हे मजुरीचे काम करतात. त्यामुळे त्यांची दोन्ही मुलं आजीसोबत राहतात. मंगळवारी रात्री आजीने साईशरणला केळी खायला दिली. अचानक केळी त्याच्या श्वासनलिकेमध्ये अडकली ज्यामुळे त्याच्या गुदमरण्याचा आवाज आला. कुटुंबीय अस्वस्थ झाले. त्यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. पण त्याला वाचण्यात यश आले नाही. ज्यावेळी साईशरणच्या घशात केळी अडकली त्यावेळी त्याला त्वरित वैद्यकीय मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता असे डॉक्टरांनी सांगितले.

Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण
Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

दरम्यान, लहान मुलांना कोणतेही फळ खायला देताना त्याचे तुकडे करून दिले पाहिजे. जर मुलांच्या घशात काही अडकले तर त्यांच्या पाठीवर मारले पाहिजे म्हणजे घशात काही अडकले असेल तर ते बाहेर पडेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. साईशरणच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. पोटचं लेकरू गमावल्यामुळे रडून रडून त्यांचे बेहाल झाले आहे.

Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण
Shocking : Pune: २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आईच्या प्रियकराचं भयंकर कृत्य; मालिश करायला सांगायचा अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com