Heartbreaking : विहिरीत पडलेला मोबाईल काढायला गेले, परत बाहेर आलेच नाहीत; ३ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Uttarpradesh Accident : उत्तरप्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यात विहिरीत पडलेला मोबाईल काढण्यासाठी तीन तरुणांनी उडी मारली. मात्र ते परतलेच नाही. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
Heartbreaking : विहिरीत पडलेला मोबाईल काढायला गेले, परत बाहेर आलेच नाहीत; ३ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Uttarpradesh HeratbreakingSaam Tv
Published On

उत्तरप्रदेशमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. मोबाईलच्या नादात तरुणांनी जीव गमावल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र फिरोजाबाद जिल्ह्यात विहिरीत पडलेला फोन काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या विहिरीत विषारी वायू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

उत्तरप्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यात मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास ध्रुव (वर्षे २५) हा त्याचा चुलत भाऊ अजय (वर्षे २८) आणि मित्र चंद्रवीर यांच्यासोबत विहिरीजवळ बसला होता. अचानक ध्रुवचा फोन विहिरीत पडला. विहिरीत पडलेल्या फोनला बाहेर काढण्यासाठी ध्रुवने विहिरीत उडी मारली. बराच वेळ ध्रुव बाहेर न आल्याने त्याला वाचवण्यासाठी अजय आणि चंद्रवीर यांनी विहिरीत उडी मारली. तिघेही परत न आल्याने स्थानिकांनी पोलिसांत तक्रार केली.

Heartbreaking : विहिरीत पडलेला मोबाईल काढायला गेले, परत बाहेर आलेच नाहीत; ३ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
UttarPradesh : कारला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू; पाहा व्हिडीओ

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाच्या मदतीने घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले. ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीने पथकाने चार तासांच्या प्रयत्नांनंतर तिघांना बाहेर काढले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Heartbreaking : विहिरीत पडलेला मोबाईल काढायला गेले, परत बाहेर आलेच नाहीत; ३ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Shocking: देखण्या सुनेवर सासऱ्याचा डोळा, चॅटिंग करत प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; शेवटी पळून जाऊन लग्न उरकलं

अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विहीर एका कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. बराच काळ वापरात नसल्यामुळे या विहिरीत मिथेन वायू तयार झाला असावा, ज्यामुळे त्यांचा मृत्यू गुदमरून झाला आहे. या अपघाताने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com