Covid 19 Cases In India : मास्क, सोशल डिस्टन्सिंग अन् चाचणी...; खबरदारी घ्या, वाढत्या कोरोनामुळं सरकारकडून अॅडव्हायझरी

Covid 19 Cases In India : देशात कोरोना विषाणूनं पुन्हा डोकं वर काढलंय. पुन्हा एकदा देशात कोरोनाची लाट धडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Covid 19 Cases In India
Covid 19 Cases In India SAAM TV
Published On

Covid 19 Cases In India : देशात कोरोना विषाणूनं पुन्हा डोकं वर काढलंय. पुन्हा एकदा देशात कोरोनाची लाट धडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय.

कोरोनाचं संकट असतानाच, इतर साथीच्या आजारांनीही थैमान घातले आहे. नागरिकांच्या आरोग्यावर दुहेरी हल्ला होत असतानाच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली आहे. कोरोना काळात पालन केलेल्या नियमांचा पुनरूल्लेख करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Covid 19 Cases In India
Special Report | Corona च्या नव्या व्हेरिएंटची दहशत? नव्या व्हेरिएंटमुळे पसरतोय कोरोना?

कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. शुक्रवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या १५९० इतकी नोंदली गेली. त्यामुळे देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही ८६०१ वर पोहोचली आहे. मागील १४६ दिवसांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोरोनाच्या संसर्गाने ६ रुगांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील तीन, तर कर्नाटक, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. (Covid Cases In India)

Covid 19 Cases In India
India Covid Update: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं टेन्शन वाढलं; PM मोदींनी बोलावली हाय लेव्हल मीटिंग

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलच्या १० आणि ११ तारखेला कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी देशभरात मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. त्या अंतर्गत संबंधित सुविधा, कर्मचारी वर्ग आणि औषधांचा साठा आदींचा आढावा घेतला जाणार आहे. अशा पद्धतीने याआधीही मॉक ड्रिल घेण्यात आली आहे.

देशातील राज्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने २७ मार्च रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एक बैठक घेण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात येईल. याच बैठकीत मॉक ड्रिल संबंधित माहिती दिली जाईल.

कोरोना विषाणू आणि फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली आहे.

लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. विशेषतः आजारी व्यक्ती आणि वयोवृद्धांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सर्व आरोग्य केंद्रांवर डॉक्टर, रुग्ण आणि तेथील कर्मचाऱ्यांनी तोंडावर मास्क घालावे. त्यामुळे विषाणूचा प्रसार नियंत्रणात येऊ शकेल.

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.

खोकताना किंवा शिंकताना अधिक खबरदारी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

शिंक किंवा खोकला आला तर तोंडावर स्वच्छ हातरुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.

हात स्वच्छ धुवण्याचाही सल्ला दिला आहे. हात वारंवार धुवायला हवेत किंवा सॅनेटाइज करत राहावे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे.

जर कोरोना विषाणूची लागण किंवा फ्लूची प्राथमिक लक्षणे दिसून आली तर, लगेच वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

फ्लू किंवा कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले असल्यास इतर व्यक्तींची भेट घेणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com