Hathras News : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात चक्रावून टाकणारी माहिती; एफआयआरमधून अनेक मोठे खुलासे

Hathras Satsang News : अपघाताचे पुरावे लपवण्यासाठी बाबाच्या सेवकांनी कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. आयोजकांनी पुरावे लपवले आणि अटींचे उल्लंघन केले, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
hathras satsang news
hathras satsang newsSaam TV
Published On

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मंगळवारी (ता २ जुलै) एक मोठी दुर्घटना घडली. फुलराई गावात आयोजित भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत महिला आणि लहान मुलांसह १२४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.

hathras satsang news
High Court: धर्मांतर थांबले नाही तर भारतातील बहुसंख्य जनता अल्पसंख्याक होईल, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

दरम्यान, पोलिसांनी (Police) या घटनेस कारणीभूत असलेल्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला असून एफआयआरमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. अपघाताचे पुरावे लपवण्यासाठी बाबाच्या सेवकांनी कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. आयोजकांनी पुरावे लपवले आणि अटींचे उल्लंघन केले, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

हातरस प्रकरणी गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्य सेवेदार देवप्रकाश मधुकर आणि सत्संग कार्यक्रमाच्या इतर आयोजकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या एफआयआरमध्ये (Police Case) जगत गुरु साकार विश्वहारी भोले बाबा यांचे नाव नाही. परवानगी मागताना आयोजकांनी सत्संगाला उपस्थित असलेल्या भाविकांची खरी संख्या लपवून ठेवल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, कार्यक्रमाला २.५ लाख लोक आले होते.

तर आयोजकांनी फक्त ८० हजार लोकांसाठी कार्यक्रमाची परवानगी घेतली होती. याशिवाय आयोजकांच्या बाजूने वाहतूक व्यवस्थापनासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. ८० हजारांच्या मेळाव्यासाठी मागितलेल्या परवानगीनुसार गर्दीची सुरक्षा, शांतता आणि वाहतूक व्यवस्था पोलिस व प्रशासनाकडून करण्यात आली.

मात्र कार्यक्रमाला अडीच लाखांहून अधिक भाविक आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जीटी रोडवर जाम, वाहतूक ठप्प झाली होती. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, जमावाचा दबाव असूनही पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

यात आयोजक आणि सेवादारांनी कुठलेही सरकार्य केले नसल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय. आयोजकांनी पुरावे लपवण्यासाठी भाविकांच्या चपला आणि इतर सामान जवळच्या शेतात फेकून दिल्या. तसेच उपस्थित भाविकांची खरी संख्या लपवण्याचा प्रयत्न केला. असंही एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

hathras satsang news
Hatras Stampede Viral Video: हाच तो व्हिडिओ, इथंच झाली चेंगराचेंगरी; हाथरस सत्संगात नेमकं काय आणि कसं घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com