Haryana Election 2024 : हरियाणात वारं उलटं फिरलं, काँग्रेसची अर्ध्या तासांतच घसरगुंडी; भाजपची सर्वात मोठी उसळी

Haryana Vidhan Sabha Election 2024 Result : हरियाणात सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, आता भाजपने मोठी उसळी घेतली असून काँग्रेस पिछाडीवर पडलं आहे.
Haryana Vidhan Sabha Election 2024 Result
Haryana Vidhan Sabha Election 2024 Result Saam TV
Published On

Haryana Assembly Election 2024 Result : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचा निकाल आज मंगळवारी जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजेपासून दोन्ही राज्यांत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा काँग्रेसने हरिणायात मोठी आघाडी घेतली होती. १० वर्षांपासून सत्तेत असलेलं भाजप पिछाडीवर पडलं होतं. मात्र, अर्ध्या तासांतच गणित बदललं असून भाजपने मोठी उसळी घेतली आहे.

हरियाणात काँग्रेसची घसरगुंडी झाली असून त्यांचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. सकाळी साडेदहा वाजेपर्यंच्या कलानुसार, भाजप सध्या ५२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस फक्त ३३ जागांवरच पुढे आहे. हरियाणामध्ये वारे उलटे फिरल्याचे चित्र तयार झालं आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून काँग्रेसच्या गोटात निराशा पसरली आहे.

विशेष बाब म्हणजे मतमोजणीच्या सुरुवातीला सकाळी १० वाजेच्या सुमारास हरियाणात काँग्रेसने तब्बल ६५ जागांवर आघाडी घेतली होती. तर भाजप फक्त १९ जागांवर आघाडीवर होते. मात्र, अर्ध्या तासांतच चित्र बदललं. सुरुवातीच्या पि‍छेहाटीनंतर हरियाणात भाजपने जोरदार मुसंडी मारत अर्धशतक पार केलं. दुसरीकडे काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर पडले.

Haryana Vidhan Sabha Election 2024 Result
Haryana Election Results 2024 Live: निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आरोप फेटाळले

उचाना कलां मतदारसंघातून दुष्यंत चोटाला चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तर अंबाला कँटमधूनही काँग्रेसचा उमेदवार पिछाडीवर आहेत. जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट पिछाडीवर पडल्या आहेत. दुसरीकडे भाजपकडे मोठी आघाडी आहे. त्यामुळे भाजप हरियाणात विजयाची हँक्ट्रिक करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, भाजपने अचानक मुसंडी मारल्यानंतर हरियाणातील बदली येथेली भाजपचे उमेदवार ओम प्रकाश धनखड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, "आम्ही अंतिम निकालाची वाट पाहत आहोत. दुपारपर्यंत आम्हीच सरकार स्थापन करत असल्याचे चित्र स्पष्ट होईल. सगळेच दावे करत आहेत पण कोणाचे दावे खरे आहेत हे निकालातून कळेल". दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये पावणे अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने तब्बल ४८ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजपा २८ तर पीडीपीने १४ जागांवर आघाडी मिळवली आहे.

Haryana Vidhan Sabha Election 2024 Result
Maharashtra Politics : विधानसभेआधी साहेबांचाच दरारा, अजितदादांना धक्क्यांवर धक्के; कोणकोण 'तुतारी'च्या मागावर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com