Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Maharashtra Politics : एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरातून भाजप सत्तेबाहेर जाताना दिसते आहे. दोन्ही राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. या निवडणुकीचा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊयात....
हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?
Mahayuti NewsSaam Tv
Published On

हरियाणा आणि जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला लागणार आहे. तत्पुर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीनूसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरातून भाजप सत्तेबाहेर जाताना दिसते आहे. तर दोन्ही राज्यात काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती करून निवडणूक लढवली आहे.

तर मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि भाजप स्वबळावर लढलेत. मात्र, यावेळी इंजिनिअर रशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 46 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्वाचे आहे.

हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

साम टीव्हीच्या पोल ऑफ पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये भाजप- 26, काँग्रेस - 44, पीडिपी आणि इतर - 20 जागा मिळणार. हरियाणात गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेत होती. मात्र सत्तांतर होऊन काँग्रेसला संधी मिळण्याचा अंदाज आहे. साम टीव्हीच्या पोल ऑफ पोलनुसार हरीयाणामध्ये भाजप 27, काँग्रेस 55 आणि इतरला 7 जागा मिळणार.

एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजानूसार जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर फारसा होणार नसल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारण महाराष्ट्रात लाडकी बहीण, अन्नपूर्णा, वयोश्री सारख्या योजना आहेत. या योजना महायुतीला तारू शकतात, अशी शक्यता आहे. महायुतीची ही जमेची बाजू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न मात्र प्रलंबित आहे. ओबीसीही आक्रमक झालेत. आता धनगर आरक्षणावरूनही राजकारण पेटलं आहे. त्यामुळे हे मुद्दे महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. तसेच वाढती गुन्हेगारी, लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी सरकार विरोधात रोष आहे.

हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?
Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

मविआ आणि महायुतीत संघर्ष असताना मनसे आणि तिसऱ्या आघाडीचीही एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मोठा राजकीय संघर्ष पहायला मिळतोय. राहुल गांधी आणि मोदी-शाह महाराष्ट्र जिंकण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करतायेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक राजकारणाला नवी दिशा देणारी असणार आहे. एव्हढं मात्र नक्की....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com