
स्वाईन फ्लू म्हणजे एच१ एन१ विषाणू पसरायला सुरुवात झाली आहे. देशात गेल्या ८ राज्यात स्वाईन फ्लू पसरायला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यात एकूण १६ राज्यात ५१६ लोक स्वाईन फ्लूने बाधित झाले आहेत. तर उपचारादरम्यान ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
स्वाईन फ्लूमुळे सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. केरळमध्ये स्वाईन फ्लूमुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी १-१ जणांचा मृत्यू झाला आहे. एनसीडीसी रिपोर्टनुसार, दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
तामिळनाडूत, पुडुचेरी, केरळ, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीत सावध राहण्याचा सल्ला एनसीडीसीने दिला आहे. तामिळनाडूमध्ये २०९, कर्नाटकात ७६, केरळमध्ये ४८, जम्मू-काश्मीरमध्ये ४१, दिल्लीत ४०, पुडुचेरी,महाराष्ट्रात २१ , गुजरातमध्ये १४ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, एनसीडीसीने सांगितलं की, '२०२४ मध्ये २०,४१४ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यातील ३४७ जणांचा मृत्यू झाला होता. रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये सर्वाधिक २८,७९८ प्रकरणे आढळले होते. त्यातील १,२१८ लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी टास्क फोर्स गठीत केली आहे.
टास्क फोर्समध्ये आरोग्य मंत्रालय, एनसीडीसी, आयसीएमआर, दिल्ली एम्स, पीजीआय चंदीगढ, निम्हांस बेंगळूरू, विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या वेगवेगळ्या मंत्रालयातील टॉप अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एच१ एन १ हा इन्फ्लूएंजा विषाणू आहे.
स्वाईन फ्लू विषाणू हा डुक्करामुळे होतो. स्वाईन फ्लू आजार हा आता मनुष्यांमध्येही संक्रमित होऊ लागला आहे. ताप, थकवा येणे, भूक न लागणे, खोकला, घसा खवखवणे, उलट्या आणि अतिसार अशी या आजाराची लक्षणे आहेत. भारतात २००९ साली पहिल्यांदा स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर २००९ ते २०१८ मध्ये भारतात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.