Vadodara Car Crash : भरधाव वेगात दुचाकींना उडवणाऱ्या रक्षितची गेल्याच महिन्यात पोलीस स्टेशनची वारी; प्रकरण काय?

Vadodara Car Crash Rakshit Chaurasia : भरधाव वेगात कार चालवून ३ दुचाकींना धडक देणाऱ्या रक्षित चौरसियाचा आणखी एक प्रताप आता उजेडात आला आहे. गेल्या महिन्यात रक्षितला पोलीस स्टेशनची वारी करावी लागली होती.
Vadodara car Accident Rakshit Chaurasia
Vadodara car Accident Rakshit Chaurasia Saam Tv News
Published On

गांधीनगर : गुजरातच्या वडोदऱ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण कार अपघातात ८ जण जखमी झाले. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. भरधाव वेगात कार चालवून ३ दुचाकींना धडक देणाऱ्या रक्षित चौरसियाचा आणखी एक प्रताप आता उजेडात आला आहे. गेल्या महिन्यात रक्षितला पोलीस स्टेशनची वारी करावी लागली होती. त्यावेळी त्याला पोलिसांनी समज दिली होती. लेखी माफीनाम्यानंतर त्याची सुटका झाली होती.

२० वर्षांचा रक्षित चौरसिया मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा रहिवासी आहे. कायद्याचं शिक्षण घेत असलेला रक्षित शिक्षणासाठी बडोद्यात राहतो. महिन्याभरापूर्वी फतेहगंजमधील एका रहिवासी इमारतीत गोंधळ घातल्यामुळे एका वकिलाने रक्षित चौरसिया आणि अन्य तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर रक्षितसह अन्य जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सयाजीगंज पोलीस ठाण्यात नेलं होतं.

Vadodara car Accident Rakshit Chaurasia
Aurangzeb Tomb: बाबरीसारखी कारसेवा करण्याची वेळ येऊ नये, औरंगजेबाच्या कबरीचा निर्णय सरकारने वेळेत घ्यावा; कोणी दिला इशारा? VIDEO

फतेहगंजमध्ये एका रहिवासी इमारतीत रक्षित आणि त्याचे मित्र पार्टीसाठी जमले होते. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला. त्यामुळे वैतागलेल्या एका वकिलाने त्यांना शांत राहण्यास सांगितलं. हा वकील त्याच इमारतीत राहत होता. वकिलाच्या बोलण्याकडे रक्षित आणि त्याच्या मित्रांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी उलट वकिलालाच धमकावलं. याची माहिती वकिलाने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सगळ्या तरुणांना पकडून पोलीस ठाण्यात नेलं. या प्रकरणात रक्षित आणि त्याच्या मित्रांनी लेखी माफी मागितली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं होतं.

Vadodara car Accident Rakshit Chaurasia
Shirdi Airport : थरारक! विमानतळावर बिबट्यांचा वावर; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धडकी भरवणारा VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com