
Gujarat High Court on Minor Girl Abortion: जुन्या काळात १४-१५ व्या वर्षी मुलीचं लग्न होणं आणि वयाच्या १७ व्या वर्षी तिला मूल होऊन ती एका मुलाची आई होणं ही अगदी सामान्य बाब होती. मनुस्मृती वाचा... तुम्हाला कळेल, अशी महत्वाची टिप्पणी गुजरात हायकोर्टाने एका प्रकरणाची सुनावणी करताना केली आहे. (Latest Marathi News)
गुजरातमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. यानंतर पीडिता गरोदर राहिली होती. ती आता सात महिन्यांची गरोदर आहे. तिच्या गर्भपाताला संमती मिळावी म्हणून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती समीर जे. दवे यांनी तोंडी मत मांडलं आहे.
दुसरीकडे पीडित मुलीच्या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी केली आहे. १८ ऑगस्टला या मुलीला प्रसूतीची तारीख डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, गर्भपातासाठी मुलीच्या वडिलांनी हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली.
त्यावर पीडिता आणि तिच्या पोटात वाढणारं बाळ या दोघांची प्रकृती व्यवस्थित असेल, तर गर्भपाताची संमती दिली जाणार नाही. असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या विषयीचं वृत्त दिलं आहे. (Breaking Marathi News)
याबाबत तोंडी मत व्यक्त करताना जस्टिस समीर दवे असं म्हणाले की “जुन्या काळात १४-१५ व्या वर्षी मुलीचं लग्न होणं आणि १७ व्या वर्षी तिला मूल होऊन ती एका मुलाची आई होणं ही अगदी सामान्य बाब होती. मनुस्मृती वाचा तुम्हाला कळेल.”
या प्रकरणात पीडितेची मेडिकल तपासणी करण्यात यावी, असे आदेश देखील हायकोर्टाने (Gujarat News) दिले आहेत. गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या प्रक्रियेदरम्यान मूल जिवंत जन्माला येण्याच्या शक्यतेबद्दलही न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली.
“जस्टिस समीर दवे जर गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यान, मूल जिवंत जन्माला आलं, तर त्याची काळजी कोण घेणार? जर एखाद्या मुलाचा जिवंत जन्म झाला असेल तर तिला मारण्याची न्यायालय परवानगी देऊ शकते का? असा सवालही न्यायाधीशांनी उपस्थित केला.
दरम्यान, कोर्टाने राजकोट सरकारी रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता यांना हे निर्देशही दिले आहेत, की मुलीची चाचणी तातडीने डॉक्टरांच्या एका पॅनलकडून करण्यात यावी त्यांचा अहवाल काय असेल त्यावर आम्ही गर्भपाताची संमती द्यायची की नाही ते ठरवू. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.