Gujarat Rain News: गुजरातमध्ये पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं; आतापर्यंत ८३ बळी

गुजरातमधील काही जिल्ह्यांना रेड अॅलर्टचा इशारा दिला आहे.
Gujarat Rain News Today, Gujarat Rainfall Updates, Heavy Rain Alert In Gujrat, Gujarat Flood News
Gujarat Rain News Today, Gujarat Rainfall Updates, Heavy Rain Alert In Gujrat, Gujarat Flood News SAAM TV

अहमदाबाद: गुजरातमधील अनेक भागांत मुसळधार पावसामुळं अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मुसळधार पावसामुळं अनेक शहरे आणि गावांत पूरस्थिती आहे. राज्यात आतापर्यंत या पावसामुळं ८३ बळी घेतले आहेत. (Gujarat Rain News Today)

मुसळधार पावसामुळं उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळं मदत आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत. भारतीय हवामान विभागाने दक्षिण गुजरात सौराष्ट्रच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, रेड अॅलर्ट जारी केला आहे.

Gujarat Rain News Today, Gujarat Rainfall Updates, Heavy Rain Alert In Gujrat, Gujarat Flood News
Pune : कोंढव्यात वाड्याची भिंत घरांवर कोसळली; ११ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

मुसळधार पावसामुळं अनेक भागांत पूरस्थिती असून, कुठे काय परिस्थिती आहे, हे जाणून घेऊयात या पॉइंटरमधून...

औरंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, वलसाड आणि आजूबाजूच्या भागात पुराचा धोका कायम आहे. या परिसरांत १४ इंच इतका पाऊस झाला आहे. वलसाडमध्ये पूरपरिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Gujarat Rain)

वलसाडच्या खालच्या भागात कश्मीरा नगर, बरुदिया वाड, हनुमान भगडा आदींसह अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे. हा सर्व परिसर नदीकाठाजवळ आहे. येथील ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. (Red Alert In Gujarat Today) (Gujarat Flood News)

Gujarat Rain News Today, Gujarat Rainfall Updates, Heavy Rain Alert In Gujrat, Gujarat Flood News
Malegaon : पूर आलेल्या नदीत उडी मारणारा तरुण बेपत्ता; स्टंटबाजीचा Video व्हायरल

मुसळधार पावसामुळे (Gujarat Rain News Marathi) केवळ वलसाड नाही तर, उमरगामच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. राजपीपला येथील एका शोरूममध्ये पाणी घुसले आहे.

गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विविध घटना घडल्या असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८३ जणांचा बळी या पावसाने घेतला आहे. (Heavy Rain Alert In Gujrat)

एसईओसीनुसार, बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून १० वाजेपर्यंत जुनागढ, गिर सोमनाथ, डांग आणि अमरेली येथे ४७ मिमी ते ८८ मीमी पाऊस झाला आहे.

भारतीय हवामान विभागानुसार (IMD), दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रच्या काही जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

दक्षिण गुजरातच्या कच्छ, भरूच, डांग, नवसारी आणि तापी जिल्ह्यांतील अनेक भागांत गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली आहे.

अतिमुसळधार पावसामुळे (Heavy Rain In Gujarat Today) कच्छ, नवसारी, डांग जिल्ह्यांतील तीन राष्ट्रीय महामार्ग, तसेच आतापर्यंत ५१ राज्यमार्ग, ४०० हून अधिक जिल्हा मार्गांचे नुकसान झाले आहे. (Gujarat Rain News Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com