Malegaon : पूर आलेल्या नदीत उडी मारणारा तरुण बेपत्ता; स्टंटबाजीचा Video व्हायरल

Malegaon Guy Stunt In Girna River Video Viral | पुराच्या पाण्यात गिरणा नदीच्या पुलावरुन एका तरुणाने उडी मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Malegaon News Today, Malegaon Accident, Malegaon Boy Stunt Jumping Accident
Malegaon News Today, Malegaon Accident, Malegaon Boy Stunt Jumping Accident अभिजीत सोनावणे
Published On

मालेगाव, नाशिक: स्टंटबाजी करणं एका युवकाच्या अंगाशी आलं आहे. पूर आलेल्या गिरणा नदीत (Girna River) उडी घेतलेला तरुण बेपत्ता झाला आहे. या तरुणाचा शोध सुरू झाला असून अद्यापही तो सापडलेला नाही. नाशिकच्या मालेगाव (Malegaon) तालुक्यातली ही दुर्देवी घटना असून तरुणाचा उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. Girna River Flood (Malegaon News Today)

हे देखील पाहा -

मागील आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू (Heavy Rain) आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील नद्या, नाले याठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या कळवण, बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तिथल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. मालेगावमधून वाहणाऱ्या गिरणा नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आला असून पुरामुळे त्यावरुन पाणी वाहत आहे. याच पुराच्या पाण्यात गिरणा नदीच्या पुलावरुन एका तरुणाने उडी मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Malegaon Boy Stunt Jumping Accident)

Malegaon News Today, Malegaon Accident, Malegaon Boy Stunt Jumping Accident
Maharashtra Rain : राज्यासाठी पुढील ४८ तास महत्वाचे; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी

उडी मारल्यानंतर हा तरुण बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. याच केटीवेअर बंधाऱ्यावर यापूर्वीही अनेकदा तरुणांकडून हुल्लडबाजी आणि स्टंटबाजीच्या घटना घडल्यात. त्यामुळे पूर परिस्थितीत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Malegaon Accident)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com