जिल्हाधिकारी बदलले; 17 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Gujarat Government Transfers 17 IAS Officers Latest News: गुजरात सरकारने 17 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मेहसाणा, आनंद आणि वाव थरादसह विविध जिल्ह्यांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
GUJARAT IAS TRANSFERS
GUJARAT IAS TRANSFERSsaam tv
Published On: 

गुजरात सरकारने शुक्रवारी प्रशासनात मोठे फेरबदल करत 17 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मेहसाना, आनंद आणि नव्याने स्थापन झालेल्या वाव-थराद जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. गुजरात सरकारने याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे. जनजातीय विकास विभागाचे सचिव आलोक कुमार पांडे यांच्याकडे मदत आयुक्त आणि महसूल विभागाच्या पदसिद्ध सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर गौरांग एच मकवाणा यांना या अतिरिक्त जबाबदारितून मुक्त करण्यात आले आहे. उत्तर गुजरात विज कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गौरांग मकवाणा यांच्याकडे गांधीनगर येथील इंडेक्स्ट बीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

GUJARAT IAS TRANSFERS
Political News : २७ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव यांची बदली करून त्यांची गांधीनगर येथे माहिती संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मेहसानाचे जिल्हाधिकारी एस.के. प्रजापती यांची गांधीनगर येथील ग्रामीण विकास आयुक्तालयात अतिरिक्त ग्रामीण विकास आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गृह विभागातील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त सचिव हर्षित पृथ्वीराज गोसावी यांची मेहसानाच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

GUJARAT IAS TRANSFERS
Political News: मोठी बातमी! काँग्रेसची ताकद वाढणार, ५ माजी मुख्यमंत्री घरवापसी करण्याच्या तयारीत

आनंदचे जिल्हाधिकारी प्रविण चौधरी यांची बदली करून त्यांची धोलेरा एसआयआर प्रकल्पांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गांधीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कच्छभुजचे जिल्हा विकास अधिकारी उत्सव गौतम यांची आनंदच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बनासकांठा-पालनपूरचे जिल्हा विकास अधिकारी एम. जे. दवे यांची नव्याने स्थापन झालेल्या वाव-थराद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कल्पेश कुमार शर्मा यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

GUJARAT IAS TRANSFERS
Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडूंविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

अहमदाबाद येथील सरदार पटेल लोकप्रशासन संस्थेचे (एसपीआयपीए) उपमहासंचालक सी. सी. कोटक यांची अहमदाबाद येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेच्या विशेष संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तापीचे जिल्हा विकास अधिकारी राम निवास बुगालिया यांची बदली करून त्यांना बनासकांठा-पालनपूर येथे नियुक्त करण्यात आले आहे. तर वलसाडचे जिल्हा विकास अधिकारी अतिराग चापलोट यांची कच्छ-भुज येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

GUJARAT IAS TRANSFERS
CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं

छोटा उदयपूरचे जिल्हा विकास अधिकारी सचिन कुमार यांची गृह विभागात कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते हर्षित गोसावी यांची जागा घेतील. महिसागर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र उपयोजना (Tribal Area Sub Plan) प्रकल्पाच्या प्रशासक वंदना मीना यांची वलसाडच्या जिल्हा विकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तापी जिल्ह्यातील सोंगढ येथे प्रकल्प प्रशासक म्हणून कार्यरत असलेले राजेश कुमार मौर्य यांची अमरेलीच्या जिल्हा विकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचबरोबर नवसारी जिल्ह्यातील वांसदा येथे प्रकल्प प्रशासक म्हणून कार्यरत असलेले स्वप्निल महादेव सिसले यांच्याकडे तापीच्या जिल्हा विकास अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.छोटा उदयपूर येथे प्रकल्प प्रशासक म्हणून कार्यरत असलेले ओंकार राजेंद्र शिंदे यांची त्याच जिल्ह्याच्या जिल्हा विकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरात गॅस लिमिटेडचे कार्यकारी संचालक बी. एन. पटेल यांची बदली करून त्यांची गांधीनगर येथे गुजरात क्रीडा प्राधिकरणाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे गुजरातमधील प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com