Bhavesh Bhandari: भिक्षुक होण्यासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करणारं हे गुजराती दाम्पत्य नेमकं कोण?

Gujarat Businessman Bhavesh Bhandari: गुजरातमधील एका बांधकाम व्यावसायिकाने आपली कोट्यवधीची संपत्ती दान केली आणि ते पत्नीसोबत भिक्षुक (Monk) झाले आहेत. भावेश भाई भंडारी (Bhavesh Bhai Bhandari) असं या व्यावसायिकाचे नाव आहे.
Bhavesh Bhandari And Wife
Bhavesh Bhandari Saam Tv
Published On

Bhavesh Bhandari And Wife:

मोह-मायाचा त्याग करुन काही जण आपली संपत्ती दान करत भक्तीचा मार्ग स्वीकारताना दिसतात. अशीच एक घटना गुजरातमधून (Gujarat) समोर आली आहे. गुजरातमधील एका बांधकाम व्यावसायिकाने आपली कोट्यवधीची संपत्ती दान केली आणि ते पत्नीसोबत भिक्षुक (Monk) झाले आहेत. भावेश भाई भंडारी (Bhavesh Bhai Bhandari) असं या व्यावसायिकाचे नाव आहे. सध्या सगळीकडे भंडारी दाम्पत्याची चर्चा होत आहे.

गुजरातमधील हिम्मतनगर येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक भावेश भाई भंडारी यांच्या नावाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर भंडारी दाम्पत्यांचे फोटो आणि त्यांची कहाणी व्हायरल होत आह. भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. जैन धर्मात दीक्षा घेणे म्हणजे संन्यास घेणे म्हणजेच भौतिक जगापासून दूर जाणे. भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीने भिक्षूक होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई दान केली. भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीने फेब्रुवारीमध्ये एका समारंभात त्यांची सर्व संपत्ती दान केली आणि या महिन्याच्या शेवटी दोघे अधिकृतपणे भिक्षूक झाले.

Bhavesh Bhandari And Wife
Ram Navmi 2024: यंदाचा राम जन्मोत्सव खास, रामनवमीनिमित्त १ लाख ११ हजार १११ किलोंचे लाडू अयोध्येत पाठवणार

DNA च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीने भिक्षूक होण्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभराच्या कमाईतून बनवलेली 200 कोटी रुपयांची संपत्ती दान केली. भंडारी यांची दोन्ही मुले म्हणजे एक मुलगा आणि मुलगी हे दोन वर्षांपूर्वी भिक्षुक झाले होते. आता आई आणि वडिलांनीही मुलांप्रमाणे भिक्षुक होण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhavesh Bhandari And Wife
Lok Sabha Election: आश्चर्यच! लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच निवडणूक आयोगाने जप्त केले 4,650 कोटी रुपये

भावेश भंडारी यांचा जन्म गुजरातमधील हिम्मतनगर येथे झाला. ते बांधकामासह अनेक प्रकारचे व्यवसाय करत होते. सध्या अहमदाबादमध्ये त्याचा बांधकाम व्यवसाय चांगला चालला होता. मात्र आता त्यांनी सर्व कामांपासून दूर राहून जैन धर्मात दीक्षा घेण्याचे ठरवले आणि ते पत्नीसोबत भिक्षुक झाले. भंडारी दाम्पत्यांची हिम्मतनगरमधून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोकं सहभागी झाले होते. 22 एप्रिल रोजी त्यांची औपचारिक दीक्षा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दिवशी हिम्मतनगर रिव्हर फ्रंटवर एकाच वेळी ३५ जण दीक्षा घेणार असून त्यात भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे.

Bhavesh Bhandari And Wife
Narendra Modi: भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार, एनडीएला पुन्हा बहुमत मिळणार; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

22 एप्रिल रोजी शपथ घेतल्यानंतर भंडारी दाम्पत्यांना सर्व कौटुंबिक संबंध तोडावे लागतील आणि त्यांना कोणत्याही भौतिक वस्तू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. यानंतर ते संपूर्ण भारतभर अनवाणी फिरतील आणि फक्त भिक्षेवर जगतील. त्यांना फक्त दोन पांढरे कपडे, भिक्षेसाठी वाटी आणि एक रजोहरण ठेवण्याची परवानगी असेल. राजोहरण हा एक झाडू आहे जो जैन भिक्षू बसण्यापूर्वी जागा स्वच्छ करण्यासाठी वापरतात. ते अहिंसेच्या मार्गाचे प्रतीक आहे आणि भंडारी दाम्पत्य यापुढे यासर्व गोष्टींचे अनुसरण करतील.

Bhavesh Bhandari And Wife
Narendra Modi: PM मोदींकडून प्रचाराचा धडाका, महाराष्ट्रात ३ मोठ्या सभा घेणार; महायुतीची ताकद वाढणार!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com