Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभेचे बिगुल वाजले, निवडणूक आयोगाने जाहीर केल्या तारखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Gujarat Assembly Election 2022
Gujarat Assembly Election 2022ANI
Published On

Gujarat Assembly Election 2022 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (Gujarat Vidhan Sabha Election 2022 Latest News)

Gujarat Assembly Election 2022
Supreme Court : लाल किल्ला हल्ला प्रकरण; दहशतवादी आरिफची फाशी कायम, SC ने फेटाळली याचिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होमग्राऊंड असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांची (Gujrat Election) सर्वांनाच उत्सुकता होती. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीबरोबरच गुजरात विधानसभेचीही निवडणूक जाहीर होईल असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीबाबत कुठलंही भाष्य केलं नव्हतं.

दरम्यान, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभेत १८२ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर निवडणूक होणार आहेत.

Gujarat Assembly Election 2022
Mumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; नेरळ स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड

५० टक्के मतदान केंद्राचे थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. ५१,७८२ मतदान केंद्र असून प्रत्येक बूथमध्ये सरासरी ९४८ मतदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ३.२४ लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच आपकडून उमेदवारांची यादी जाहीर

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी 22 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत 108 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. AAP हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने गुजरात निवडणुकीसाठी 100 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com