महागाईचा फटका! 143 वस्तूंच्या किंमती वाढवण्याची शक्यता

'या' वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार
GST
GSTSaam Tv
Published On

नवी दिल्ली - महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या णखी महागाईचा भार उचलावा लागण्याची शक्यता आहे. कारण जीएसटीचे नियमन करणाऱ्या GST परिषदेने 143 वस्तूंवरील कर जीएसटी स्लॅब वाढवण्यासाठी राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत. या सूचनांवर राज्यांकडूनही करार झाला आहे.

हे देखील पाहा -

'या' वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार

या 143 वस्तूंमध्ये घड्याळ, सूटकेस, परफ्यूम,पापड, गुळ, पॉवर बँक, कपडे, गॉगल्स, फ्रेम, टीव्ही (32 इंचांपर्यंतचा), चॉकलेट, कस्टर्ड पाऊडर, हँड बॅग्स, च्युइंग गम, नॉन-अल्कोहलिक ड्रिंक, वाशबेसिन, अखरोट, चश्मा आणि चामड्याच्या वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. यातील सुमारे 92 टक्के वस्तूंच्या किमतींचा 18 टक्के जीएसटी टॅक्स स्लॅबवरून 28 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये समावेश करावा असे जीएसटी परिषदेने सुचवले आहे. यासोबतच अनेक गोष्टींना Exempt List मधून काढून त्यांना टॅक्सच्या कक्षेत आणण्याचा विचार देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

GST
देशद्रोह्यांवर एक-दोन दगड पडतातच; संजय राऊतांचे शिवसैनिकांना समर्थन

2017 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये चामड्याच्या वस्तू, कपडे, कॉस्मेटिक उत्पादनं, फटाके, प्लास्टिक,परफ्यूम, लॅप्स, साउंड रेकॉर्डर इत्यादी वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला होता. जीएसटी कौन्सिलच्या सध्याच्या शिफारशी मान्य केल्या तर आता या सर्व गोष्टींवर ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. 2018 च्याजीएसटीT बैठकीत या सर्व वस्तूंच्या किमतीत कपात करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com