देशद्रोह्यांवर एक-दोन दगड पडतातच; संजय राऊतांचे शिवसैनिकांना समर्थन

देशद्रोहींवर एखाद-दुसरा दगड पडतोच असे राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानचे सर्व अकाऊंट चेक करायला हवेत.
Kirit Somaiya- Sanjay Raut
Kirit Somaiya- Sanjay RautSaam TV
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले. विरोधी पक्षाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. INS Vikrant निधीचा अपहार करणारा आरोपी. बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो. लोकांच्या भावना तीव्र होतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला (BJP) इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? Ins vikrant घोटाळा देशद्रोह आहे! अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांवरती निशाणा साधला आहे. देशद्रोहींवर एखाद-दुसरा दगड पडतोच असे राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानचे सर्व अकाऊंट चेक करायला हवेत. देणगीदारांची नावं देतो, अनेक देणगीदारांवर ईडीची कारवाई सुरु आहे. देणगीदारांची कॅरेक्टर तपासा असे संजय राऊत म्हणाले आहेत. तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाबाबत आम्ही तुम्हाला विचारतो का? मग पोलिसही जर कारवाई करत असतील तर काही असेल तरच कारवाई होईल ना. जे देशद्रोही, गुन्हेगार आहेत त्यांच्याविषयी भाजपला एवढी मळमळ का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या हल्ल्याला मुंबई पोलिसांना जबाबदरा धरले आहे. आणि पोलीस सरकारच्या सांगण्यावरुन काम करत असल्याचंही फडणवीस म्हणाले होते. जर मुंबई पोलीस पक्षाच्या सांगण्यावर काम करतात असं त्यांना वाटत असेल तर न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा कोणासाठी काम करतात? असा प्रश्नही राऊतांनी विचारला आहे.

केंद्राची झेड प्लस सिक्युरिटी हा एक मोठा घोटाळा आहे. जर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्ष नेत्यांनी काही प्रश्न असतील तर आधी मुख्यमंत्र्यांना भेटा नंतर तुम्हाला काय केंद्रात भेटायचं असेल, युनोत जायचं असेल तिकडे जा. वैफल्यग्रस्त माणूस फडणविसांसारखी वक्तव्य करतो. शिवसैनिक आक्रमक झाले असतील तर होय शिवसेना शिवसैनिकांचं समर्थन करते असे राऊत म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com