GST Counsil Meeting | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आज जीएसटी काऊन्सीलची बैठक... (पहा व्हिडिओ)
GST Counsil Meeting | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आज जीएसटी काऊन्सीलची बैठक... (पहा व्हिडिओ)Saam Tv

GST Counsil Meeting | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आज जीएसटी काऊन्सीलची बैठक... (पहा व्हिडिओ)

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे मोठ्या प्रमाणात वाढल्याने महागाईत भर पडली
Published on

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे मोठ्या प्रमाणात वाढल्याने महागाईत भर पडली आहे. त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लखनऊमध्ये होत असलेल्या वस्तू आणि सेवा कर कायदा (GST) परिषदेत काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.

पहा व्हिडिओ-

मोदी सरकारकडून पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे. जीएसटी परिषदेत याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणायला मंजूरी मिळाली, तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव एका फटक्यात 25 रुपयांनी कमी होऊ शकणार आहे. इंधन जीएसटीच्या कक्षेत आल्याने राज्यांना त्यावर कराच्या माध्यमात येणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

GST Counsil Meeting | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आज जीएसटी काऊन्सीलची बैठक... (पहा व्हिडिओ)
राज्यपालांना कोरोना निर्बंधांचा विसर? सत्कारावेळी स्वत: काढला मास्क

यामुळे राज्यांकडून या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आजच्या जीएसटी परिषदेत काय भूमिका घेणार, हे बघावे लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com