
बॉयफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला.
गळफास घेण्यापूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
या पोस्टचा अलर्ट मिळाल्यामुळे पोलिसांनी तरुणीची जीव वाचवला.
Shocking Incident : एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर 'Good bye in my life' असे लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येशी संबंधित अलर्ट मेटाला मिळाला. त्यानंतर मेटाने पोलिसांनी याची माहिती दिली. तब्बल १९ मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाचा जीव वाचवला. तणावामुळे तरुणीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी तरुणीला समुपदेशनासाठी पाठवले.
मेटा अलर्ट आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे उत्तर प्रदेशाच्या गोरखपूरमधील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचा जीव वाचला आहे. बेलघाट पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या या तरुणीने आज (२९ जुलै) इंस्टाग्रामवर मी आत्महत्या करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. पंख्याला दुपट्ट्याचा फास बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
तरुणीच्या या पोस्टची दखल घेत मेटा या सोशल मीडिया कंपनीने उत्तरप्रदेश पोलीस मुख्यालयाच्या सोशल मीडिया सेंटरला ईमेल अलर्ट पाठवला. ही माहिती मिळताच पोलीस महासंचालक राजीव कृष्णा यांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. मोबाईल नंबरच्या आधारे तरुणीचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. बेलघाट पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षक आणि महिला कॉन्स्टेबल अवघ्या १९ मिनिटांमध्ये विद्यार्थिनीच्या घरी पोहोचले.
कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पोलिसांनी तातडीने विद्यार्थिनीला फासावरुन खाली उतरवले आणि तिच्यावर प्रथमोपचार केले. चौकशीदरम्यान, तरुणीचे तिच्या प्रियकराशी भांडण झाले होते. या भांडणामुळे ती मानसिक तणावाखाली होती. त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणीच्या कुटुंबाने पोलीस आणि मेटाचे आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.