जगभरातील समुद्रातील पोटात काय दडलंय हे वैज्ञाकांनिकांसह सर्वांसाठी कुतूहलाचा विषय आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती असल्याचा दावा शास्त्रज्ञ नेहमीच करत असतात. त्यादिशेने जगभरात संशोधन सुरू आहे. अशाच संशोधनादरम्यान पॅसिफिक महासागरात सोन्याच्या अंड्यासारखी एक वस्तू सापडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी संशोधकांना दक्षिण अलास्का समुद्रात हे सोन्याचं अंडे सापडलं आहे. संशोधकांना समुद्रात एक चमकणारी वस्तू दिसली होती. ज्याच्या एका बाजूला छिद्र आहे. यावरुन असा अंदाज बांधला जात आहे की, अंड्यातील जीव याच छिद्रातून बाहेर पडला.
नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननुसार (NOAA), या चमकदार वस्तूला स्पर्श केल्यास ते स्पंचप्रमाणे भासत आहे. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर नव्या जीवाच्या समुद्रातील वास्तव्याबाबत माहिती मिळू शकते. (Latest Marathi News)
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, साउथॅम्प्टनमधील नॅशनल ओशनोग्राफी सेंटरचे डॉ. टॅमी हॉर्टन यांनी सांगितलं की समुद्रात रहस्यमयी गोष्टी सापडणे ही सामान्य बाब आहे. आमच्याकडे शोधण्यासारखे बरेच काही आहे. त्याचा अधिक बारकाईने अभ्यास करू, असंही त्यांनी सांगितलं. तो कोणत्या प्रकारचा जीव आहे हे शोधण्यासाठी विविध चाचण्या केल्या जातील. (International News)
प्लायमाउथ विद्यापीठातील खोल समुद्रातील पर्यावरणशास्त्राचे प्राध्यापक केरी हॉवेल यांनी म्हटलं की, चमकदार ही वस्तू समुद्रातील इतर गोष्टींपेक्षा वेगळी आहे. मागील 20 वर्षांपासून मी समुद्राच्या खोलात संशोधन करत आहे. पण आजपर्यंत मला असं काही सापडलं नव्हतं. समुद्रात अशा अनेक प्रजाती आहेत; ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ही त्यापैकी एक असू शकते. जर तो स्पंज असेल तर त्या छिद्रातून प्राणी श्वास घेत असावा आणि जर अंडे असेल तर त्यातून कोणीतरी प्राणी बाहेर आला असावा, असाही दावा त्यांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.