Girl Stabbed To Death in London: लंडनमध्ये भारतीय तरुणीची हत्या! पोलिसांना फ्लॅटमेटवर संशय, एक जण ताब्यात

Indian Girl Murder In London: युकेमध्ये मास्टर ऑफ सायन्स कोर्स शिकण्यासाठी ती गेली होती. मंगळवारी लंडनमधील नील्ड क्रिसेंट, वेम्बली येथील निवासी इमरतीत घी घटना घडली.
Girl Stabbed To Death in London
Girl Stabbed To Death in Londonsaam tv
Published On

Hyderabad Girl Stabbed To Death in London: लंडनमध्ये भारतीय तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील 27 वर्षीय तरुणीची लंडनमध्ये हत्या झाली असून तेजस्विनी कोंथम असे या मुलीचे नाव आहे. लंडनच्या वेम्बली परिसरात तिची चाकूने भोसकून करून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. युकेमध्ये मास्टर ऑफ सायन्स कोर्स शिकण्यासाठी ती गेली होती. मंगळवारी लंडनमधील नील्ड क्रिसेंट, वेम्बली येथील निवासी इमरतीत घी घटना घडली.

उच्च शिक्षणासाठी तेजस्विनी लंडनला गेली होती. सकाळी दहाच्या सुमारास तिच्या खोलीवर हल्ला झाला आणि तिची हत्या करण्यात आली. तेजस्विनीच्या एका फ्लॅटमेटवर तिच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्राझीलच्या एका नागरिकाला अटक केली आहे.

Girl Stabbed To Death in London
Breaking News: एसटी कामगारांसाठी खुशखबर! आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

या हत्येतील एका मुख्य आरोपीला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एका २८ वर्षीय तरुणीला रुग्णालयात दाखल उपचारासाठी करण्यात आले आहे.

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, 'हत्येच्या संशयावरून एक मुलगी आणि एका मुलाला अटक करण्यात आली आहे. तर एका महिलेला सोडून देण्यात आले आहे. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी यापूर्वी ब्राझिलियन नागरिक केविन अँटोनियो लॉरेन्को डी मोराइसचा फोटो जारी केला होता आणि त्याचा शोध घेण्यासाठी लोकांची मदत मागितली होती. (Breaking News)

Girl Stabbed To Death in London
Ashish Deshmukh News: मोठी बातमी! माजी आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार

तेजस्विनीच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की "आम्हाला आज सकाळी घटनेची माहिती मिळाली. ती केव्हा घडली हे आम्हाला माहित नाही. आम्हाला माहिती मिळाली की ती गंभीर आहे आणि रुग्णालयात आहे." ती तीन वर्षांपूर्वी लंडनला गेली होती आणि तिथं एमएस कोर्स पूर्ण केला होता असं तिच्या वडिलांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com