Earth impact: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? शास्त्रज्ञांची चिंता वाढली

Will Asteroid 'JR250' Destroy Half the Earth: पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हे आम्ही नाही..तर शास्त्रज्ञ म्हणतायत... त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
earth news
earth news saam tv
Published On

अवकाशातून पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या एका महाकाय लघुग्रहानं शास्त्रज्ञांची चिंता वाढवलीय. या लघुग्रहामुळं पृथ्वीचा विनाश होणार असून अर्धे जग नष्ट होईल, असं सांगितलं जातयं. पृथ्वीवर 8 अब्ज लोकं राहतात. त्यामुळे पृथ्वीवर हा लघुग्रह आदळल्यास काय होणार? अशी भीती अनेकांना सतावू लागलीय. या लघुग्रहामुळं पृथ्वीवर किती नुकसान होऊ शकतं, असा प्रश्न निर्माण झालाय. आधी या लघुग्रहाबद्दल जाणून घेऊया.

शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाला 'JR250' असं नाव दिलंय

'JR250' लघुग्रहाचा वेग बुलेट ट्रेनपेक्षा शेकडो पटीनं जास्त

'JR250' चा आकार 25 मजली इमारतीइतका मोठा

लघुग्रह 250 फूट लांब आणि 50 फुटांपेक्षा जास्त रुंद

लघुग्रह 1 तासापेक्षा कमी वेळात पृथ्वीभोवती फिरणार

लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास 1 हजार अणुबॉम्बइतकी ऊर्जा निर्माण होईल

लघुग्रह ताशी 41 हजार किमी वेगानं पृथ्वीच्या दिशेनं सरकतोय

पृथ्वीच्या दिशेने येणारे बहुतेक लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट होतात. मात्र JR250 लघुग्रह त्याला अपवाद ठरलाय. त्यामुळे शास्त्रज्ञांना या लघुग्रहाच्या आदळण्याची चिंता वाटू लागलीय. शास्त्रज्ञांना 1908 साली सायबेरियात पडलेल्या लघुग्रहामुळे झालेला विनाश आठवू लागलाय. त्यावेळी लघुग्रहाच्या आदळण्यामुळे 2000 चौरस किमीचं जंगल जळून राख झालं होतं.

ज्यामुळे महाकाय JR250 लघूग्रहामुळं किती भयानक विध्वंस होईल, याची चिंता शास्त्रज्ञांना सतावतेय. सध्या हा लघूग्रह पृथ्वीवर पोहोचणार नाही, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र जर JR 250 आपला मार्ग बदलून पृथ्वीवर आदळला तर मोठा विनाश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा काही काळ शास्त्रज्ञांसह सगळ्यांसाठीच मोठ्या आव्हानाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com