Shocking News: संसदेत तुफान राडा, खासदारांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; VIDEO होतोय व्हायरल

Georgian Parliament Fight: 'फॉरेन एजेन्ट' या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही बाजूंच्या खासदारांनी एकमेंकाना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
Georgian Parliament Fight
Georgian Parliament FightSaam TV

Georgian Parliament MP Fight Viral Video

जॉर्जिया देशाच्या संसदेत सोमवारी (ता. १५) तुफान राडा झाला. 'फॉरेन एजेन्ट' या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही बाजूंच्या खासदारांनी एकमेंकाना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही, तर त्यांनी एकमेकांच्या अंगावरील कपडे देखील फाडले. (Breaking Marathi News)

Georgian Parliament Fight
Iran-Israel: इस्रायल-इराण युद्धात शेअर बाजार होरपळला, श्रीमंतांनी गमावले कोट्यवधी रुपये; सर्वाधिक नुकसान कोणाचे?

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. जॉर्जिया देशातील संसदेत 'फॉरेन्स एजेन्ट' विधेयक मांडले जाणार आहे. मात्र, विधेयक मांडण्याआधीच याला जनतेने मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. 'फॉरेन्स एजेन्ट' विधेयकाविरोधात नागरिकांनी अनेक ठिकाणी आंदोलने सुरु केली आहे.

अशातच, जॉर्जियाच्या संसदेत सोमवारी सत्ताधारी पक्षाचे प्रमुख बोलत होते. यावेळी त्यांनी 'फॉरेन एजेन्ट' विधेयकावरील उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षातील खासदारांनी जोरदार विरोध दर्शवला. यावेळी दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरु झाली.

एका खासदाराने सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यावरून दोन्ही बाजूंचे खासदार आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही, तर एकमेकांच्या अंगावरील कपडे देखील फाडले.

यामुळे जॉर्जियाच्या संसदेत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे याआधीही हा कायदा देशात आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, प्रचंड विरोधामुळे तो पुढे ढकलण्यात आला. जॉर्जिया हा रशियाच्या सीमेला लागून असलेला देश आहे. सध्याचे सरकार रशियाच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे.

Georgian Parliament Fight
Accident News: वाऱ्याच्या वेगाने रिक्षा पळवली, ताबा सुटताच क्रेनला धडक; ७ जणांचा जागीच अंत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com