... तर Gen Z पुन्हा रस्त्यावर उतरणार, कॉक्रोच जनता पार्टीचा मोदी सरकारला इशारा

Gen Z Protest Warning Cjp Vs Modi Government: विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून सीजेपीचा केंद्र सरकारला इशारा; आश्वासन मोडल्याचा आरोप करत पुन्हा देशव्यापी आंदोलनाची चेतावणी.
CJP leaders address media after meeting, warning of fresh nationwide protests over alleged police action on students.
CJP leaders address media after meeting, warning of fresh nationwide protests over alleged police action on students.saam tv
Published On

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास आणि इतर प्रमुख पदाढीकऱ्यांनी आज राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची दिल्ली येथे भेट घेतली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला आहे. जर आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई थांबली नाही आणि दाखल केलेले गुन्हे मागे घेतले नाहीत, तर तरुणाई पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करेल. 25 जुलै रोजी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या कराराचे सरकार उल्लंघन करत आसल्याचा आरोप CJP ने केला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी घेऊन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर जोरदार आंदोलन झाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरूणांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर सरकार आणि सीजेपीमध्ये चर्चा झाली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्या केल्याचे सांगत तरुणांनी आंदोलन मागे घेतले. मात्र आता सीजेपीचे म्हणणे आहे की, आंदोलन मागे घेण्याच्या बदल्यात आंदोलकांवर कुठल्याही प्रकारची पोलीस कारवाई न करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आता याउलट विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना लक्ष केले जात आहे. असा आरोप सौरभ दास यांनी केला आहे.

आंदोलन कशांत करायचे आणि नंतर आंदोलकांवर कारवाई सुरू करायची हीच सरकारची कार्यपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई होत आहे, त्या सर्वांना सीजेपी मदत करत असल्याचे ही ते म्हणाले. देशभरात तरूणांवर दाखल केलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावे अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन छेडू असा इशारा सौरभ दास यांनी दिला. सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, सरकारने स्पष्ट केले आहे की शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com