GDP
GDPSaam TV

अर्थव्यवस्थेच्या वेगाला महागाईचा ब्रेक; चौथ्या तिमाहीत GDP घसरून ४.१ टक्क्यांवर

तज्ञांच्या मते देशाचा विकासदर मंदावण्यामागचे प्रमुख कारण हे महागाई आहे.
Published on

मुंबई : आर्थिक २०२१-२२ वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे आकडे आज जाहीर झाले असून या तिमाहीत भारताचा विकास दर (India's Growth Rate) ४.१ टक्के राहिला आहे. तज्ञांच्या मते देशाचा विकासदर मंदावण्यामागचे प्रमुख कारण हे महागाई आहे. तसंच आकडेवारीनुसार चौथ्या तिमाहीमध्ये देशाचा जाडीपीमध्ये वाढ होऊन तो ४०.७८ लाख कोटी झाला आहे, जो मागच्या तिमाहीमध्ये (२०२०-२१) ३९.१८ लाख कोटी होता.

भारत सरकारच्या आकडेवारीनुसार मार्च तिमाहीमध्ये जीडीपीचा दर ४.१ टक्के नोंद झाला आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपीचा दर ८.७ टक्के नोंदवण्यात आला आहे. हे आकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जगभरातील महागाई (Inflation) वाढल्यामुळे २८ फेब्रुवारी पर्यंत जाहीर केलेल्या ८.९ टक्के अंदाजापेक्षा कमी होते. तर २०२०-२१ देशाचा विकास दर हा ६.६ टक्के होता.

हे देखील पाहा -

दरम्यान, मागील आर्थिक वर्षातील तिमाही (ऑक्टोंबर आणि डिसेंबर) मध्ये विकास दर ५.४ टक्के होता. तोच विकास दर एप्रिल आणि जून या तिमाहीमध्ये देशाचा व GDP विकास दर २०.१ टक्के तर जुलै आणि सप्टेंबरमध्ये ८.४ टक्के होती. या आकडेवारीनुसार २०२१-२२ मध्ये जीडीपी विकास दर ८.७ टक्के नोंदवला गेला आहे. तसंच आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये अर्थव्यवस्था चांगली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, याआधी या चौथ्या तिमाहीत जीडीपीचा विकास दर २.७ असेल असा अंदाज एसबीआयने, इन्क्राने ३.५ तर क्रिसिलने ४.५ असेल असा अंदाज वर्तवला होता. उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात मुख्य क्षेत्रातील वाढ ही ८.४ टक्के होती. तसंच एप्रिल २०२२ मध्ये कोळसा, वीज, रिफायनरी उत्पादन, सिमेंट आणि नैसर्गिक वायू उद्योगांचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com