
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांना आज संध्याकाळी इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान बेळगाव येथे उद्या होणारा मेळावा काँग्रेसने रद्द केले. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे पंतप्रधान होते. १९९१ ९६ दरम्यान त्यांनी पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणूनही काम केलं आहे,त्यावेळी देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा झाल्या.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म १९३२ मध्ये पाकिस्तानचा भाग असलेल्या भागात झाला. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात एलपीजी (उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण) सुधारणांचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांना श्रेय दिले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.