Judgment of Divorce: पतीला आई-वडिलांपासून दूर राहण्यास भाग पाडणे ही पत्नीची क्रूरता, उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

High Court News Today: पतीला आई-वडिलांपासून दूर राहण्यास भाग पाडणे ही पत्नीची क्रूरता, उच्च न्यायालय
Judgment of Divorce
Judgment of DivorceSaam TV

High Court News Today: जर एखाद्या स्त्रीने तिच्या पतीला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास भाग पाडले तर ते घटस्फोटाचे कारण असू शकतं घटस्फोटाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना कलकत्ता उच्च न्यायालयाने ही माहिती दिली आहे.

एका खटल्याची सुनावणी करताना खंडपीठाने सांगितले की, पतीला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास भाग पाडणे म्हणजे मानसिक क्रूरता आहे. असे केल्याने घटस्फोटासाठी पुरेसे कारण ठरू शकते. मुलाने आई-वडिलांची काळजी घेणे आवश्यक आणि नैतिक कर्तव्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. खंडपीठाने म्हटले की, भारतीय संस्कृतीत मुलाने आई-वडिलांसोबत राहणे सामान्य आहे.

Judgment of Divorce
Sanjay Raut Defamation Case : 'मी ऑफ द रेकॉर्ड काही बोलू का?' मेधा सोमय्या यांची कोर्टात अजब मागणी, न्यायमूर्ती म्हणाले...

न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती उदय कुमार हे या खंडपीठाचा भाग होते. त्यांनी कुटुंब न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारा महिलेची याचिकाही फेटाळून लावली आहे. कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या घटस्फोटाच्या अर्जाला परवानगी दिली होती. हे प्रकरण 2009 चे आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मिदनापूरच्या कौटुंबिक न्यायालयाने प्रशांत कुमार मंडल यांची पत्नीपासून घटस्फोटाची याचिका मान्य केली होती. प्रशांतने पत्नी झरणावर मानसिक क्रूरतेचा आरोप करत घटस्फोट घेतल्याचे बोलले होते. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही माहिती दिली.

कौटुंबिक न्यायालयाने म्हटले होते की, 2001 मध्ये लग्न झाल्यापासून दोघांचे संबंध चांगले नव्हते. झरणाने प्रशांतचा अनेकवेळा जाहीर अपमान केला. तसेच त्याला बेरोजगार आणि भित्रा म्हटले होतो. यानंतर प्रशांत कुमार मंडल यांनी शाळेत शिकवायला सुरुवात केली आणि खाजगी शिकवणीही शिकवायला सुरुवात केली.

Judgment of Divorce
Stock Market Latest Updates: फक्त 5 दिवसात 20 टक्क्यांनी वाढला टाटा समूहाचा 'हा' शेअर, 3 वर्षांत सुमारे दिला 3015% परतावा

त्याचे कारण म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याची कमाई कमी होती. इतकंच नाही तर झरणा त्या वेळी कामाला जात होती आणि तिला पगारही चांगला होता. पण ती कुटुंबाला मदत करत नव्हती. प्रशांत सरकारी नोकरीत रुजू होण्याच्या तयारीत असतानाही या प्रक्रियेदरम्यान झरणाने त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com