संतापजनक! शस्त्रांचा धाक दाखवत गर्भवती महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार

Five Man Group Sexual Assault on a pregnant woman : काही दिवसांपुर्वीच कराचीमध्ये एका चालत्या ट्रेनमध्ये २५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आला होता.
Five Man Group Sexual Assault on a pregnant woman at gunpoint in Jhelum, Pakistan
Five Man Group Sexual Assault on a pregnant woman at gunpoint in Jhelum, PakistanSaam Tv

इस्लामाबाद, पाकिस्तान: एका गर्भवती महिलेवर (Pregnant woman) पाच जणांनी मिळून बलात्कार (gang-raped) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पाकिस्तानच्या पंजाब (Pakistan's Punjab) प्रांतांत ही घटना घडली आहे. (Five Man Group Sexual Assault on a pregnant woman at gunpoint in Jhelum, Pakistan)

हे देखील पाहा -

पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, ही गर्भवती महिला झेलम (Jhelum) शहरात राहते. त्यादिवशी ती घरात एकटी होती. याचाच फायदा घेत पाच जण हत्यारांसह तिच्या घरात दाखल झाले. घरात शिरलेल्या पाच नराधमांकडून अगोदर तिला मारहाण करण्यात आली, त्यांनंतर त्या गर्भवती महिलेचे हात-पाय बांधून पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या थरारक घटनेनंतर पंजाब प्रांत पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Five Man Group Sexual Assault on a pregnant woman at gunpoint in Jhelum, Pakistan
धावत्या एक्स्प्रेसमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, तिकिट नसल्याने AC कोचमध्ये नेले

पंजाब प्रांतातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आले आहे, आणि पुढील तपासासाठी रक्ताचे नमूने लाहोरच्या वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. काही दिवसांपुर्वीच कराचीमध्ये एका चालत्या ट्रेनमध्ये २५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानात पुन्हा एका क्रुरपणे सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com