Jan Shatabdi Express Fire News : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला आग, धुराचे लोट पाहून प्रवासी धडाधड खाली उतरले

Bhubaneswar Howrah Jan Shatabdi Express Fire : भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला आज, गुरुवारी सकाळी आग लागली. कटक रेल्वे स्थानकात ही दुर्घटना घडली.
Bhubaneswar Howrah Jan Shatabdi Express Fire
Bhubaneswar Howrah Jan Shatabdi Express FireSAAM TV
Published On

Jan Shatabdi Express Fire :

भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला आज, गुरुवारी सकाळी आग लागली. कटक रेल्वे स्थानकात ही दुर्घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटक रेल्वे स्थानकात (Cuttack railway station) ही दुर्घटना घडली. जनशताब्दी एक्स्प्रेसच्या (Jan Shatabdi Express) एका डब्याला आग लागली. ही आग किरकोळ होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhubaneswar Howrah Jan Shatabdi Express Fire
Sameer Khan-Javeria Khanum : आईच्या मोबाईलमधील फोटो ते ५ वर्षांची प्रतीक्षा; पाकिस्तानची जवेरिया लग्नासाठी भारतात पोहचली, ४५ दिवसांनी पुन्हा परतावं लागणार

कटक रेल्वे स्थानकात गुरुवारी सकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला लागलेली आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. एक्स्प्रेसच्या डब्याच्या खालील बाजूस आग लागली होती. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत होते.

या घटनेनंतर खबरदारी म्हणून प्रवाशांना तात्काळ डब्यातून खाली उतरवण्यात आले. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जनशताब्दी एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी भुवनेश्वर स्थानकातून रवाना झाली. ती कटक रेल्वे स्थानकात पोहोचली. तिथेच एक्स्प्रेसचे ब्रेक जाम झाले. एका डब्याच्या खालील बाजूस आग लागली.

डब्याच्या खालील बाजूकडून धूर बाहेर निघत असल्याचे पाहून काही प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सर्व प्रवासी तात्काळ डब्यातून खाली उतरू लागले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आग आटोक्यात आणल्यानंतर अग्निसुरक्षा पथकाने एक्स्प्रेसमध्ये पाहणी केली. ब्रेक बाइंडिंगमुळे ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व काही सुरळीत असल्याची खात्री पटल्यानंतर अधिकाऱ्यांनी एक्स्प्रेस पुढील प्रवासाकरिता रवाना केली. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेनंतर बराच वेळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

Bhubaneswar Howrah Jan Shatabdi Express Fire
Emergency Landing: अहमदाबादहून दुबईला निघालेल्या विमानात तरुणाला हार्ट अ‍ॅटॅक; पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com