लखनौ : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर (Gorakhpur) जिल्ह्यात एक अतिशय थरारक घटना घडली आहे. बलात्कार आणि अपहरणाचा आरोप असलेल्या तसेच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीला पीडित मुलीच्या वडिलांनीच गोळ्या घातल्या आहेत. मुलीच्या वडिलांनी सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या आरोपीच्या डोक्यात गोळ्या झाडून आरोपीची हत्या केली आहे. (Gorakhpur Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, दिलशाद हुसैन असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा न्यायालयाच्या आवारात जागेवरच मृत्यू झाला आहे. तर पीडित मुलीचे वडील निवृत्त सैनिक असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्यामुळे येथे काही काळासाठी खळबळ उडाली होती. (Crime News In Marathi)
आरोपीचे दुकान बलात्कार पीडितेच्या घरासमोर;
पोलिसांनी सांगितले की, मृत दिलशाद हुसेन हा गोरखपूरच्या बधलगंज येथील पटनाघाट तिराहा येथे निवृत्त बीएसएफ जवान भागवत निशाद यांच्या घरासमोर पंक्चरचे दुकान चालवत होता. 12 फेब्रुवारी 2020 रोजी दिलशादने त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यानंतर 17 फेब्रुवारीला भागवत यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. 12 मार्च 2021 रोजी पोलिसांनी दिलशादला हैदराबाद येथून अटक केली आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेल्या दिलशादची पोलिसांनी तुरुंगात रवानगी केली होती. पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे आरोपी हुसैन मागील दोन वर्षांपासून तुरुंगात होता. मात्र काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.
हे देखील पहा-
यावेळी ता. 21 जानेवारी (शुक्रवार) रोजी याच बलात्कार प्रकरणात गोरखपूर जिल्हा न्यायालयात सुनावणी (Case Hearing) होणार होती. त्यामुळे आरोपी सुनावणीसाठी आला होता. त्याला पाहून पीडितेच्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्याच्यावर धाड धाड दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये गोळी आरोपीच्या थेट डोक्याच्या आरपार गेली, यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
याबद्दल एसएसपी विपिन टाडा यांनी माहिती दिली की, न्यायालयाच्या आवारात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.