Hingoli: मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला पहारा!

हिंगोली ग्रामीण पोलिसात आरोपी पती सह नराधामावर गुन्हा दाखल
Hingoli Crime News In Marathi
Hingoli Crime News In MarathiSaam Tv
Published On

संदीप नागरे

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका नवऱ्याने आपल्या पत्नीवर मित्राला बलात्कार (Sexual Assault) करायला लावला आहे. पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून आरोपी पती एकाला घरी घेऊन आला होता. यावेळी त्याने त्याला घरात पाठवून पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Hingoli Crime News In Marathi)

Hingoli Crime News In Marathi
भूमिका करणं म्हणजे 'त्यांचं' समर्थन का? नाना पाटेकरांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

पोलिसांनी घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना हिंगोली जिल्ह्यातील सवड या गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्रीच्या सुमारास पीडित महिला घरी एकटीच होती. त्यावेळी आरोपी पती आपला आणि नराधम माधव जोगदंड याला घरी घेऊन आला. यावेळी आरोपी पती घराबाहेर थांबून मित्राला घरात पाठवून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार करण्यात घरात पाठवून दिले. चाकूच्या धाक दाखवून त्याने महिलेवर बलात्कार देखील केला आहे. धक्कादायक म्हणजे यावेळी विकृत पती घराबाहेर उभा होता.

हे देखील पहा-

नराधमाने देखील त्याच्या पत्नीला चाकुचा धाक दाखवून जबरी अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनंतर पीडित महिलेने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात (Hingoli Police Station) धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. आरोपी पतीने यापूर्वी देखील चारित्र्यावर संशय घेऊन अनेकदा मानसिक त्रास (Emotional Harassment) दिल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला. त्यांनतर नात्याला काळिमा फासत त्याने पत्नीवर बलात्कार घडवून आणला. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही अटक केलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com