PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांनो, दरमहा ५५ रुपये भरा, महिन्याला ३ हजार पेन्शन मिळवा ; जाणून घ्या संपूर्ण योजना

Shetkri Yojana/Scheme: PM Kisan Mandhan Yojana Details in Marathi | केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी नवनव्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना देखील जाहीर केली आहे.
PM Kisan Mandhan Yojana For Farmers
PM Kisan Mandhan Yojana For FarmersSaam tv

PM Kisan Mandhan Yojana Information:

केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी नवनव्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना देखील जाहीर केली आहे. या योजनेचं नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना' असं आहे. या योजनेत शेतकऱ्यांना महिन्याला ५५ रुपये भरावे लागतात, त्यानंतर ६० वर्षांनंतर महिन्याला ३००० रुपये मिळण्यास सुरु होते.

वयाच्या ६० वर्षानंतर शेतकरी शारीरिकरित्या काम करण्यास सक्षम राहत नाही. अशावेळी या ज्येष्ठ शेतकऱ्यांना उदारनिर्वाहासाठी घरातील दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावं लागतं. यामुळे या शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना आणली आहे.

PM Kisan Mandhan Yojana For Farmers
Pension Schemes: खासगी नोकरदारांना सरकार देणार पेन्शन, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

दरमहा भरा ५५ रुपये

केंद्र सरकारने २०१९ साली 'प्रधानमंत्री किसान मानधन योजना' सुरु केली. छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. १८ ते ४० वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत वेगवेगळ्या वयोगटातील वर्गाला वेगळा प्रीमियम भरावा लागतो.

या योजनेत प्रीमियम हा ५५ रुपये ते २०० रुपयांपर्यंत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर ३ हजार रुपये पेन्शन मिळते. काही कारणात्सव शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला १५०० मासिक पेन्शन दिली जाते.

PM Kisan Mandhan Yojana For Farmers
Government Schemes: जबरदस्त आहे ही सरकारी योजना! 10 हजार गुंतवा, मॅच्युरिटीच्या वेळी मिळणार 32 लाख रुपये

योजना सुरु करण्याची प्रक्रिया काय?

या योजनेत शेतकऱ्यांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.. तिथे त्यांना लॉगिन करावे लागेल. त्यानंतर शेतकऱ्याला सविस्तर माहिती भरावी लागेल. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल, पुढे साईटवर ओटीपी नोंद करून योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल. या योजनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा. यानंतर योजनेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com