Employee Quits Job on First Day : मला हे काम आवडलं नाही, असे म्हणत एका तरूणाने नोकरीच्या पहिल्याच दिवशी कंपनी सोडली. एचआरने याबाबतचा लिंक्डइनवर एक पोस्ट टाकली, त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. नवीन नियुक्त जालेल्या कर्मचाऱ्याने फक्त एका दिवसात जॉब सोडला. मला हे काम आवडलं नाही, असं कारण सांगत नोकरी सोडली. धक्का बसलेल्या एचआरने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत खंत व्यक्त केली. कर्मचाऱ्याने कोणताही फोन अथवा स्पष्टीकरण न देता नोकरी सोडल्याचेही एचआरने आपल्या पोस्टमध्ये सांगितले.
लिंक्डइनवरील एचआरच्या पोस्टनुसार, पहिल्याच दिवशी कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय नोकरी सोडणारा तरूण सेल्स विभागात जॉईन होणार होता. सेल्सची नोकरी अधिक आव्हानात्मक आणि कठीण असल्याचे मुलाखतीदरम्यान सांगितल्याचा दावा एचआरने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. कर्मचाऱ्याने एका दिवसात काहीही न सांगता नोकरी सोडल्याने एचआरने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
"कोणतीही नोकरीमध्ये एका दिवसात परफेक्ट येत नाही अथवा होत नाही. कोणतीही कंपनी २४ तासांत सर्वकाही सिद्ध करू शकत नाही. वेळ दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट अथवा कोणतीही भूमिका यशस्वी होणार नाही, असे एचआरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. "
नवीन जॉब शोधणाऱ्यांना अथवा जाईन करणाऱ्यांना एचआरने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मुलाखतीवेळी उमेदवाराने आपल्या मनाताली शंका स्पष्टपणे विचारायला हव्यात. समोरून आलेली ऑफर स्वीकारण्याआधी हजारवेळा विचार करावा, कोणतीही घाई करू नये. मुलाखतीत मनातील सर्व प्रश्न स्पष्ट विचारा. कंपनीने ऑफर दिलीही पण तुम्हाला खात्री नसेल तर घाईने होकार देऊ नका. एकदा नोकरी स्वीकारली, तर त्याला योग्य न्याय द्या. महत्त्वाचे म्हणजे, संवाद साधा. कामासंदर्भात शांत राहू नका, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, असा सल्ला त्या एचआरने कर्मचाऱ्यांना दिला आहे.
एचआरने कर्मचाऱ्याबद्दल केलेल्या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडलाय. काहींनी कर्मचाऱ्याने पहिल्याच दिवशी दिलेल्या राजीनाम्यावर आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी त्या तरूणाचे समर्थन करत एचआरवर टीका केला आहे. तरूणाने पहिल्याच दिवशी नोकरी का सोडली, याचं कारण शोधण्याचा सल्ला एका युजर्सने दिला आहे. ही पोस्ट शेअर करण्यापेक्षा, त्या कर्मचाऱ्याला काम का आवडलं नाही, याचा शोध घ्यायला हवा, असे अन्य एका युजर्सने म्हटले आहे. हा जेन झेडचा परिणाम आहे. एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतरही, अचानक त्यांचा मूड बदलतो आणि ते कधीही नोकरी सोडतात, असे एका युजर्सने म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.