PM Narendra Modi: जगातील आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला (Tesla Cars) लवकरच भारतात कारचे उत्पादन सुरु करणार आहे. या कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनीच याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यांनी भारतात लवकरात लवकरत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी टेस्लाचे सीईओ आणि ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना एलॉन मस्क यांनी ही मोठी घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीदरम्यान, एलॉन मस्क यांनी भारतात आपला व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा केली. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांनी मोदींना टेस्लाच्या भारतात उत्पादन युनिट स्थापन करण्याच्या योजनेची माहिती दिली. याआधी टेस्लाच्या अधिकाऱ्यांच्या एका टीमने गेल्या महिन्यात नवी दिल्लीत भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी टेस्लाच्या भारतात उत्पादनाबाबत प्रस्ताव मांडला होता.
न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदी आणि एलॉन मस्क यांची भेट झाली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खूपच चांगली भेट झाली. मी मोदींचा चाहता असून मला ते फार आवडतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी आमच्या फॅक्टरीला भेट दिली होता. आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहोत.' तसंच, 'सौरऊर्जा गुंतवणुकीसाठी भारत देश सर्वोत्तम आहे. भारताच्या भविष्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. मला वाटते की जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताकडे फार काही गोष्टी देण्यासारख्या आहेत.'
या भेटीनंतर यूएस-आधारित ईव्ही निर्माता टेस्ला कंपनी भारतात त्यांची उत्पादने लॉन्च करणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर एलॉन मस्क यांनी सांगितले की, 'मला खात्री आहे की टेस्ला भारतात असेल आणि शक्य तितक्या लवकर येईल. पंतप्रधानांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो आणि आशा आहे की आम्ही भविष्यात काही घोषणा करू.'
एलॉन मस्क यांनी यावर्षी एप्रिलमध्ये पीएम मोदींना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. कॅलिफोर्नियामधील टेस्ला मोटर्स फॅक्टरीला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी गेले होते. दरम्यान, टेस्लाला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल तर त्यांना देशात उत्पादन प्रकल्प उभारावा लागेल, असे भारताकडून सातत्याने बोलले जात होते. तर टेस्लाची आयात शुल्क कमी करण्याची मागणी होती. अशा परिस्थितीत, मोदी आणि टेस्लाचे सीईओ यांच्या भेटीनंतर एलॉन मस्क यांची ही मोठी गोष्ट खूपच महत्वाची मानली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.