Elon Musk: इलॉन मस्क यांच्याकडे स्वतःचं घर नाही; मित्राकडे रहावं लागतंय, कारण...

Elom Musk Latest News: फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, ते 20x20 च्या भाड्याच्या घरात राहतात. हे घर Boxablb नावाच्या गृहनिर्माण स्टार्टअपने बांधले आहे. हे घर फोल्ड करण्यायोग्य आहे आणि वाहतूक करता येते.
Elon Musk has no home of his own; friend, he is living with his friends
Elon Musk has no home of his own; friend, he is living with his friendsSaam Tv
Published On

Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे स्वतःतं घर नाही असं म्हटलं तर खरं वाटणार नाही. पण हे खरं आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे स्वतःतं घरंच नसल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. तसेच ते आपल्या मित्राच्या घरात राहतात असंही मस्क यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. (Elon Musk, the world's richest person, says he doesn't own a home right now and rotates around friends' spare rooms

हे देखील पहा -

2020 मध्ये, इलॉन मस्कने ट्विटरवर सांगितले की ते त्यांच्या आयुष्यातील भव्यता कमी करत आहे आणि यापुढे त्याच्यासोबत घर राहणार नाही. अवघ्या एका वर्षात त्यांनी आपल्या सर्व 7 आलिशान वाड्या विकल्या. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, ते 20x20 च्या भाड्याच्या घरात राहतात. हे घर Boxabl नावाच्या गृहनिर्माण स्टार्टअपने बांधले आहे. हे घर फोल्ड करण्यायोग्य आहे आणि वाहतूक करता येते.

ब्लूमबर्गच्या मते $251 अब्ज एवढी संपत्ती मस्क यांच्याकडे आहे. याबाबत अमेरिकेच्या खासदार सेन. एलिझाबेथ वॉरन यांनी मस्कसारख्या अब्जाधीशांवर त्यांच्या तुलनेने कमी कर असल्याबाबत टीका केली आहे. इलॉन मस्क यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांना त्यांच्या खर्चासाठी मित्रांकडून पैसे घ्यावे लागले. त्यांना दिवाळखोर होण्याची भीती वाटत नाही का? या प्रश्नावर इलॉन मस्क म्हणाले – जास्तीत जास्त काय झाले असते, तर माझ्या मुलांना सरकारी शाळेत जावे लागले असते, तर त्यात मोठी गोष्ट काय?, मी स्वतः सरकारी शाळेत शिकलो आहे. इलॉन मस्कचे हे उत्तर त्यांचे व्यक्तिमत्त्व सांगण्यासाठी पुरेसे आहे.

Elon Musk has no home of his own; friend, he is living with his friends
Viral Video : वाघ आहे की मासा? स्विमिंग स्किल पाहून येईल 'लाईफ ऑफ पाय'ची आठवण

इलॉन मस्क यांना मंगळावर मानवांची एक स्वयंपूर्ण वसाहत स्थापन करायची आहे. अणुयुद्ध किंवा लघुग्रहाच्या टक्करमुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आपल्यासाठी सर्वात योग्य ग्रह मंगळ आहे. याद्वारे मानव त्यांचा नाश टाळू शकतो. सप्टेंबर 2016 मध्ये, मस्क यांनी त्यांच्या योजना आणि तांत्रिक बाबी देखील तपशीलवार स्पष्ट केल्या आहेत. मस्कच्या मते, २०२२ पर्यंत स्पेसएक्स रॉकेट मंगळावर जाऊ शकेल. 2050 पर्यंत, एक स्वयंपूर्ण मानवी वस्ती असेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com