Viral Video : वाघ आहे की मासा? स्विमिंग स्किल पाहून येईल 'लाईफ ऑफ पाय'ची आठवण

Sundarban Tiger Viral Video: भारतीय वन सेवा अधिकारी परवीन कासवान (Parveen Kaswan, IFS) यांनी हा व्हिडिओ शेयर केला असून हा व्हिडिओ जुना असल्याचं त्यांनी सांगितलं.
Tiger Swimming Viral Video From Sundarban, Animal Viral Videos,
Tiger Swimming Viral Video From Sundarban, Animal Viral Videos, Twitter/ @ParveenKaswan

कोलकाता: पश्चिम बंगाल राज्यात असलेलं सुंदरवन या अभयारण्यात लाखो प्रकारचे पशु-पक्षी आहेत. जैविक विविधता असलेल्या या अभयारण्यात वाघांची संख्याही बरीच आहे. सध्या या ठिकाणच्या एका वाघाचा व्हिडिओ (Viral Video) प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात हा वाघ (Tiger) बोटीतून थेट नदीत उडी मारतो आणि उत्तम प्रकारे पोहून किनाऱ्यावर जातो. (Tiger Swimming Viral Video From Sundarban)

हे देखील पहा -

भारतीय वन सेवा अधिकारी परवीन कासवान (Parveen Kaswan, IFS) यांनी हा व्हिडिओ शेयर केला असून हा व्हिडिओ जुना असल्याचं त्यांनी सांगितलं. या व्हिडिओतील वाघाला वन विभागाने एका ठिकाणाहून रेस्क्यू (Rescue) केले होते. त्यानंतर त्या वाघाला बोटीवर ठेवण्यात आले. या वाघाला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी या वाघाला बोटीमधून नेण्यात येत होते. बोटीवरील एका पिंजऱ्यात या वाघाला ठेवण्यात आले होते. बोट नदी किनाऱ्याजवळ येत असताना वन अधिकाऱ्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. बोट किनाऱ्यापासून अजूनही काहीशी लांबच होती. मात्र, इतक्यात असं काही घडलं की वन अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. (tiger sized jump though. Old video of rescue & release of tiger from Sundarbans)

Tiger Swimming Viral Video From Sundarban, Animal Viral Videos,
बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; बँका उघडण्याची वेळ बदलली, जाणून घ्या डिटेल्स

रेस्क्यू केलेल्या वाघाने पिंजऱ्याचा दरवाजा उघडताच क्षणाचाही विचार न करता थेट नदीतच उडी घेतली. एका क्षणासाठी वन अधिकाऱ्यांनाही त्या वाघाची काळजी वाटली. पण, शेवटी वाघच तो. पाण्यात उडी मारताच त्या वाघाने सुसाट पोहायला (Swimming) सुरुवात केली आणि काही क्षणातच तो वाघ नदी किनारी पोहोचला आणि सुंदरवनच्या जंगलात गडप झाला. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हा वाघ आहे की मासा अशी गंंमतीशीर कमेंट केली. तर एका यूजरने ट्विटरवर लिहीलं की, या वाघाला पाहून लाईफ ऑफ पाय (Life Of Pi) या चित्रपटाची आठवण झाली. ट्विटरवर या व्हिडिओला एक लाखांच्या आसपास व्हिव्यूज् मिळाले असून हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com