ED Raids: अकोल्यासह मध्यप्रदेशात अनेक भागात ईडीची छापेमारी, 'या' कंपनीने केली ३ बॅंकाची १०९.८७ कोटींची फसवणूक

ED Raids In Bank Fraud: ईडीने अकोल्यासह मध्यप्रदेशात अनेक भागात मोठी कारवाई केली आहे. तीन बॅंकांच्या फसवुकीच्या प्रकरणातून ही कारवाई केल्या गेल्याचं सांगितलं जातंय.
ED Raids
ED RaidsSaam Tv
Published On

ED Raids In Akola

मेसर्स नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मोठी फसवणूक केली आहे. तब्बल तीन बँकांची १०९.८७ कोटींनी ही फसवणूक केली (ED Raids In Bank Fraud) आहे. (Latest Crime News)

मेसर्स नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं (Narayan Exports India Private Limited Company) ज्या कारणासाठी कर्ज घेतलं होतं, त्यावर पैसे खर्च केले गेले नव्हते. याशिवाय कर्जाची परतफेड देखील केली नाही. त्यामुळे या प्रकरणी भोपाळ येथे कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकूण ११ ठिकाणी ईडीची छापेमारी

वसुली संचालनालयाने (ईडी) मध्य प्रदेशातील इंदोर, जौरा, मंदसौरसह महाराष्ट्र राज्यातील अकोल्यात एकूण ११ ठिकाणी छापेमारी (ED Raid) केली आहे.

छापेमारी दरम्यान संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे, स्थावर मालमत्ता ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली (ED Raid In Akola) आहे. दरम्यान ३१ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ED Raids
Hemant Soren News: हेमंत सोरेन यांची आजची रात्र तुरुंगातच, ED कोठडीवर उद्या होणार फैसला

कंपनीच्या आर्थिक व्यवहारात गुंतागुंत

कंपनीने ज्या कारणांसाठी कर्ज घेतलं होतं, त्यासाठी त्याचा वापर केलेला नाही. कर्जाच्या रकमेचा बनावट हिशेब या कंपनीने बँकांना सादर केला (ED Raids In Bank Fraud) होता. याप्रकरणी सर्वप्रथम सीबीआयने भोपाळमध्ये गुन्हा दाखल केला. त्याअनुषंगाने तपास केला. आरोपपत्र देखील दाखल केलंय.

कंपनीच्या व्यवहारातील आर्थिक गुंतागुंत उजेडात आली. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू (crime new) केला. मेसर्स नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिच्या समूह कंपन्यांची कार्यालये, संचालक मंडळांच्या निवासस्थानांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या प्रकरणाचा आणखी तपास ईडीकडून केला जातोय.

ED Raids
Kishori Pednekar On ED Enquiry | ईडी चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com